एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 14:47 IST2020-02-06T14:45:53+5:302020-02-06T14:47:00+5:30
त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एमडी विक्रीसाठी आलेल्या दुकलीला पोलिसांनी केले गजाआड
ठाणे - एमडी या अमली पदार्थाची विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील मनीष बोरीचा (३४)आणि रवी खोडा भाईवाला (३२) या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यामध्ये २५३ ग्रॅम वजनाची एमडी पावडर असून त्याची किंमत १२ लाख ६२ हजार इतकी आहे. तसेच वाहन, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १२ लाख ९८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ते दोघे एमडी विक्रीसाठी मुंब्रा रेतीबंदर येथे येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे एनडीपीएसी पथकाचे पोलीस शिपाई उदय किरपण यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई २ फेब्रुवारीला करण्यात आल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.