तीन जिल्हयात १७ गुन्हयांत फरारी असलेला आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 02:38 PM2019-09-03T14:38:10+5:302019-09-03T14:38:58+5:30

जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत..

The accused arrested who is absconding in 17 case of crime from three districts | तीन जिल्हयात १७ गुन्हयांत फरारी असलेला आरोपी जेरबंद

तीन जिल्हयात १७ गुन्हयांत फरारी असलेला आरोपी जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई 

बारामती: पुण्यासह तीन जिल्हयातील १७ गुन्हयांत  फरारी आरोपी जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला यश आले आहे. त्याच्यावर  पुण्यासह सोलापुर,सातारा जिल्ह्यात दुचाकी  चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.आरोपी बारामतीमध्ये गणेशोत्सवासाठी आला होता. वेशांतर करुन सापळा रचून सिनेस्टाइल पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले आहे.पुणे ग्रामीण  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हयातील १२ , पुणे शहर आयुक्तालय २ , पिंपरी चिंचवड आयुक्तालय १, सातारा जिल्हा १, सोलापूर जिल्हा १ अशा एकूण १७ गुन्हयांमध्ये फरारी असलेला अट्टल गुन्हेगार अमोल उर्फ लखन विलास देशमुख (वय २९ रा.यवत ता.दौंड जि.पुणे, सध्या रा.खंडोबानगर, बारामती ) यास बारामती मोरगाव रोड, ढवाणवस्ती येथून ताब्यात घेतले आहे.
     पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबविणेबाबत पथकाला आदेश दिलेले होते. त्यानुसार  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे  सहा. पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांचे पथक नेमण्यात आलेले होते.
पथकाने शिक्रापूर , दौंड, लोणीकाळभोर, लोणीकंद, वडगाव निंबाळकर, जेजुरी, वानवडी, हडपसर, चाकण, फलटण सातारा, अकलूज या पोलीस स्टेशनचे हद्दीतील मोटरसायकल चोरीच्या एकूण १७ गुन्हयामध्ये दोन वर्षांपासून फरारी असलेला रेकॉर्डवरील आरोपी अमोल उर्फ लखन विलास देशमुख याची माहिती काढली . पोलीस त्याचा शोध घेत असल्याने त्याने यवत येथील घर बदलून कुरकुंभ, दौंड, पणदरे त्यानंतर बारामती येथे राहण्यास गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या पत्त्यावर जावून त्याची माहिती काढली.परंतू, वारंवार पत्ते बदलत असल्याने व घरी क्वचितच येत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. तो सध्या बारामती येथे राहण्यास गेला असून तो ट्रकवर कर्नाटक, बेंगलोर येथे ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची तसेच बारामती जवळील खंडोबानगर परिसरात अधूनमधून येत असल्याची पोलीस पथकाला माहिती मिळाली. त्या ठिकाणी बातमीदारामार्फत माहिती काढली.आरोपी लखन देशमुख हा दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी गणेश उत्सवासाठी बारामती येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने बारामती खंडोबानगर परिसरात वेशांतर करुन सापळा रचला.मात्र, फरारी आरोपी अमोल देशमुख  बारामती- मोरगाव रस्त्यावरील ढवाणवस्ती येथे पोलिसांची चाहूल लागल्यावर तो मोटरसायकलवर पळून जाण्याच्या तयारीत असताना सिनेस्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीने चोरलेल्या मोटरसायकली यापूर्वीच त्याच्या साथीदाराकडून हस्तगत केलेल्या आहेत.
     आरोपी लखन देशमुख याचेवर यापूर्वी पुणे जिल्हयात यवत, बारामती शहर, बारामती तालुका या पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी, खंडणी, पळवून नेणे, चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीने फरारी असताना आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास चालू आहे.आरोपीस पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले
आहे.

Web Title: The accused arrested who is absconding in 17 case of crime from three districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.