गळा चिरुन तृतीय पंथीयाचा खुन करणारा आरोपी गजाआड...अवघ्या १२ तासात लागला छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:43 PM2019-03-12T15:43:19+5:302019-03-12T15:44:45+5:30

'तु मेरी फ्रेंड को छोड दे, मेरे को छोडा तो तुझे बदनाम करुंगी. तेरे घर के आगे जलाके लुंगी, मिडीया बुलाऊंगी अशी धमकी देऊन टाँर्चर केल्याने चिडून मी गळ्यावर सुरीने वार करुन खुन केला.

The accused arrested who was murdered transgender | गळा चिरुन तृतीय पंथीयाचा खुन करणारा आरोपी गजाआड...अवघ्या १२ तासात लागला छडा

गळा चिरुन तृतीय पंथीयाचा खुन करणारा आरोपी गजाआड...अवघ्या १२ तासात लागला छडा

Next

वानवडी : हांडेवाडी सदाशिवनगर भागातील पिंपळे इमारती मध्ये सोमवारी सकाळी अरबाज शेख उर्फ नजफ वय २१ रा. ससाणेनगर, हडपसर या तृतीय पंथीचा खुन केलेल्या आरोपीला १२ तासाच्या आत पकडण्यात युनिट ३ च्या पोलीसांना यश आले आहे. यामध्ये आरोपी अरबाज अहमद शेख, रा. लक्ष्मीनगर येरवडा यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट ३ येथील पोलीस करत असताना पोलीस नाईक विल्सन डिसोजा यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की तृतीय पंथीचा खुनाचा गुन्हा अरबाज अहमद शेख याने केला असून तो जोशी वडेवाले लक्ष्मीनगर येथे येणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे तपास केला असता त्याने सांगितले, मयत अरबाज शेख उर्फ नजफ याने मला 'तु मेरी फ्रेंड को छोड दे, मेरे को छोडा तो तुझे बदनाम करुंगी. तेरे घर के आगे जलाके लुंगी, मिडीया बुलाऊंगी अशी धमकी देऊन टाँर्चर केल्याने चिडून मी गळ्यावर सुरीने वार करुन खुन केला. आरोपी अरबाज अहमद शेख यास वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कार्यवाही करिता देण्यात आले आहे. सापळा रचून आरोपी पकडण्याची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहा. पो. आयुक्त गुन्हे शाखा १ चे समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो. निरीक्षक दिपक निकम, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, किरण आडगळे, फौजदार दत्तात्रय गरुड, मच्छिंद्र वाळके, संतोष क्षिरसागर, गजानन गाणबोटे, रोहिदास लवांडे, विल्सन डिसोजा, सचिन गायकवाड या पथकाने केली.

Web Title: The accused arrested who was murdered transgender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.