गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:08 PM2020-11-19T19:08:42+5:302020-11-19T19:12:18+5:30
चाळीसगाव शहरातील घाटरोडवर परीसरात गावठी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व स्टीलची मॅगझिन बाळगणाऱ्या चाँद सलीम सय्यद याला पोलीसांनी अटक केली आहे.
चाळीसगाव : शहरातील घाटरोडवर परीसरात नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील चहाच्या टपरीशेजारी गावठी बनावटीचे पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व स्टीलची मॅगझिन बाळगणाऱ्या चाँद सलीम सय्यद याला पोलीसांनी अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार दानिश असलम शेख हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई १८ रोजी रात्री १०.२० वाजता करण्यात आली.
पोलीसांना या घटनेची गुप्त माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक सचिन मोरे व पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सय्यद, पोलीस नाईक भगवान उमाळे, पंकज पाटील, ओंकार सुतार, निलेश पाटील, अमोल पाटील यांच्या पथकाने आरोपी चाँद सलीम सैय्यद याच्या ताब्यातून विना परवाना बेकायदेशीर असलेले ३० हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन हजार रुपये किंमतीची स्टीलची मॅगझिन व ६०० रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुस असा एकूण ३२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. आरोपी चाँद सलीम सय्यद व दानिश असलम शेख (दोघे नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगाव ) या दोघांविरुद्ध शहर पोलीसात भाग ६,शस्र अधिनियम १९५९चे कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद करीत आहे.