बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पुन्हा ५ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 11:26 IST2021-01-04T11:26:40+5:302021-01-04T11:26:46+5:30
ही घटना चाळीसगाव तालुक्यात रविवारी रात्री आठ वाजता घडली.

बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पुन्हा ५ वर्षीय बालिकेवर केला अत्याचार
जळगाव : बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून आलेल्या आरोपीने पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यात रविवारी रात्री आठ वाजता घडली.
संदीप सुदाम तिरमाली (३३, शिरसगाव ता.चाळीसगाव) असे या आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर तो पसार झाला होता. त्याला रात्रीच मनमाड येथे पकडण्यात आले. बलात्कार प्रकरणात त्याला सात वर्षाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो काही दिवसापूर्वीच परतला होता.