चालक खून प्रकरणातील आरोपींना मोक्का लावणार;अवैद्य दारू रोखण्यासाठी सरप्राईज व्हीजीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 09:10 PM2020-12-16T21:10:11+5:302020-12-16T21:10:28+5:30
पोलीस उपमहानिरीक्षक मोहिते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य दारू गोवा येथून येते.
सावंतवाडी : कोल्हापूर येथील चालकावर खुनी हल्ला करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना सूचना केली असून लवकरच याबाबतचा प्रस्ताव तयार होईल असे कोकण विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले ते पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी निमित्त बुधवारी सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. त्यांनी अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाईसाठी सरप्राईज व्हीजीट करणार असल्याचे सांगितले . यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शशिकांत खोत आदी उपस्थित होते.
पोलीस उपमहानिरीक्षक मोहिते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य दारू गोवा येथून येते. तीच दारू पुढे जाते या दारू धंद्या मध्ये ज्याचा सहभाग आहे त्याची माहीती घेण्यात येत आहे. सोलापूर पुणे येथेही कारवाई झाली आहे. यापुढेही तसेच कारवाई होईल. गोव्यातून येणाऱ्या दारूवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी आपण स्वतः सरप्राईज डिलीट करणार आहोत तसेच पोलीस अधीक्षक का नाही दारू धंद्याला आळा घालण्यास संदर्भात सूचना केल्या आहेत वेगवेगळी पथके नेमण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर येथील टेम्पो चालकांवर सावंतवाडीत हल्ला झाला त्यात चालकाचा मृत्यू झाला आहे आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या आरोपींवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याची सर्व माहिती घेऊन आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत असे मोहिते यांनी सांगितले.