हवाई सुंदरीच्या नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा;सराईत आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:01 PM2018-10-15T21:01:01+5:302018-10-15T21:01:29+5:30

याआधीही नासीरवर साकीनाका आणि नागपाडा पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्हयांची नोंद आहे. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

The accused duped money to give assurance for air hostess job | हवाई सुंदरीच्या नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा;सराईत आरोपी गजाआड

हवाई सुंदरीच्या नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा;सराईत आरोपी गजाआड

Next

मुंबई - हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न बाळगून हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेतले होते. मात्र, चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीला नोकरीला लावण्याचं आमिष दाखवून दोन तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी अटक केली आहे. नासीर हुसैन मोहिनुद्दीन खान असं या आरोपीचं नाव आहे. याआधीही नासीरवर साकीनाका आणि नागपाडा पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्हयांची नोंद आहे. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पवई परिसरात राहणाऱ्या तरुणीने हवाई सुंदरीचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यामुळे ती चांगल्या कंपनीत हवाई सुंदरी म्हणून नोकरीच्या शोधात होती. त्यावेळी एका वेबसाईटवर हवाई सुंदरीच्या नोकरीबाबत जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीतील संपर्कक्रमांकावर तरुणीने फोन लावून नोकरीबाबत विचारणा केली असता नासीरने तिला २ लाख रुपये भरावे लागतील असं सांगितलं. त्यानुसार सुरुवातीस तक्रारदार तरुणीने साठ हजार रुपये नासीरला दिले. त्यानुसार नासीरने तरुणीला कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता देऊन बोगस नियुक्ती पत्र दिलं. त्यानंतर तरुणी तिथे गेली असता अशा प्रकारे कोणतीही नियुक्ती करण्यात आली नसल्याचं तिला सांगण्यात आले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने पवई पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानुसार नासीरला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. पोलिस चौकशीत नासीर हा सराईत आरोपी असून त्याच्यावर साकीनाका आणि नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. 

Web Title: The accused duped money to give assurance for air hostess job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.