चारित्र्यावर संशय घेत तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:42 PM2019-02-12T13:42:23+5:302019-02-12T13:44:49+5:30
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचा आरोपीने छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत, वेळोवेळी मानसिक त्रास दिला..
पिंपरी : पिंपळेगुरव येथील काशिद पार्कमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिच्या वडिलांनी सुर्यकांत पुष्पेंद्र रावल (रा. मध्यप्रदेश) या आरोपीविरोधात सांगवी पोलिसांकडे सोमवारी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरूद्ध तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचा आरोपीने छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत, वेळोवेळी मानसिक त्रास दिला. बदनाम करण्याची भिती दाखवली. २० १५ पासून तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे तरूणीने ३१ डिसेंबला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या पालकांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने याबाबत तक्रार दिली नव्हती. मात्र सोमवारी आरोपी सुर्यकांत रावल यानेच तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. या आरोपाची तक्रार सांगवी पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मध्यप्रदेश, जबलपुरला असल्याने त्यास अद्याप अटक झालेली नाही. सांगवी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.