Coronavirus : आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, तुर्भेतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 09:18 PM2020-05-15T21:18:09+5:302020-05-15T21:23:00+5:30

Coronavirus : अवैधरित्या व्यवसाय सुरु ठेवल्याने केलेली कारवाई

Accused found Corona positive, incident in Turbhe pda | Coronavirus : आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, तुर्भेतील घटना 

Coronavirus : आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह, तुर्भेतील घटना 

Next
ठळक मुद्देत्याच्या संपर्कात आलेल्या चौघा पोलिसांनचीही चाचणी करण्यात आली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.शहरात लॉकडाऊन असतानाही दुकान खुले ठेवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय तुर्भे सेक्टर 21 येथे सुरु होता.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्याला सीबीडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या चौघा पोलिसांनचीही चाचणी करण्यात आली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

शहरात लॉकडाऊन असतानाही दुकान खुले ठेवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा व्यवसाय तुर्भे सेक्टर 21 येथे सुरु होता. 5 मे रोजी एपीएमसी पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला होता. यावेळी अवैधरित्या व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या दांपत्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली. यावेळी त्यांच्या दोन लहान मुलांच्या संगोपनासाठी वडिलाला पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया करून सवलत देण्यात आली होती. यांनतर 11 मे रोजी त्याला अटक केल्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.  त्याचा अहवाल प्राप्त झाला असता, त्याला कोरोनाची लागण झालेली असल्याचे समोर आले. यामुळे त्याला सीबीडी येतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर कोरोना पॉजिटीव्ह असल्याने त्याला जामीन द्यावा यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे शिफारस केली असता न्यायालयाने  फेटाळली. यामुळे त्याच्यावर कोविड सेंटरमध्ये पाळत ठेवण्यासाठी देखील पोलीस बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. 

भांडणाच्या रागातून पतीवर पत्नीने ओतले उकळलेलं पाणी 

 

दुर्दैवी! शेतातून घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली, १३ जणांचा मृत्यू 

 

Palghar Mob Lynching : साधू हत्या खटल्यात पीडितांची बाजू लढवणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू

 

यादरम्यान चौकशी निमित्ताने तसेच न्यायालयात घेऊन जाण्या येण्याच्या प्रक्रियेत चार पोलीस त्याच्या सतत संपर्कात होते. त्यांची देखील चाचणी करण्यात आली असून तूर्तास त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे नवी मुंबई पोलिसांमध्ये भीती पसरली आहे. एखाद्या गुन्ह्यातील आरोपी पकडताना त्याच्याशी संपर्क येत असल्याने चाचणीनंतर तो पॉजिटीव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांसह पोलिसांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाचा धोका सतावत आहे. शिवाय एपीएमसी मार्केट आवारातच सर्वाधिक कोरोना पॉजिटीव्ह व्यक्ती आढळून येत आहेत. त्यामुळे अज्ञात व्यक्तींसोबत सुरक्षित अंतर ठेवूनच कामकाज करावे लागत आहे. अशातच पकडलेला आरोपी पॉजिटीव्ह आढळून आल्याने गुन्हेगारांवर कारवाई करतानाही पोलिसांवर कोरोनाची टांगती तलवार निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title: Accused found Corona positive, incident in Turbhe pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.