स्वच्छतागृहाच्या लाइटमुळे आरोपी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:21 AM2019-05-07T07:21:00+5:302019-05-07T07:21:07+5:30

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खुनाचा आरोप असलेला एक आरोपी घरात अंधार करून स्वच्छतागृहात दडून बसला. मात्र स्वच्छतागृहात असलेल्या उजेडावरून पोलिसांना संशय आला आणि सोमवारी त्यांनी आत शिरत त्याच्या मुसक्या आवळल्या.

 The accused found the lanterns of the sanitary latrine | स्वच्छतागृहाच्या लाइटमुळे आरोपी सापडला

स्वच्छतागृहाच्या लाइटमुळे आरोपी सापडला

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खुनाचा आरोप असलेला एक आरोपी घरात अंधार करून स्वच्छतागृहात दडून बसला. मात्र स्वच्छतागृहात असलेल्या उजेडावरून पोलिसांना संशय आला आणि सोमवारी त्यांनी आत शिरत त्याच्या मुसक्या आवळल्या. कुरार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गुजरातमध्ये २०१२ साली एस. चौधरी नामक व्यापाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी गुलाम हुसेन उर्फ वसीम कदु खान (४८) याला अटक केली होती. तेव्हापासून तो अनेकदा पॅरोलवर बाहेर आला होता. २७ डिसेंबर २०१५ रोजी त्याला १५ दिवसांची पॅरोल मंजूर झाली. त्यानंतर साडेतीन वर्षे तो पसार होता. चौकशीदरम्यान तो मुंबईत मालाडमध्ये लपल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. त्यांनी मुंबई पोलिसांची मदत मागितल.
खान पठाणवाडीमध्ये लपल्याची माहिती परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार यांना मिळाली. राठोड आणि कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे आणि पथकाने गुजरात पोलिसांसह पठाणवाडीत सोमवारी पहाटे सापळा रचला. घरात काळोख होता. पथक माघारी परतणार तोच घरातील स्वच्छतागृहात उजेड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात कोणीच नसताना स्वच्छतागृहात लाइट कसा, असा प्रश्न त्यांना पडला आणि तपासून पाहिले असता हातात सुटकेस, नवीन कपडे घालून पसार होण्याच्या तयारीत असलेला खान त्यांना दिसला. कुरार पोलिसांनी त्याला अटक करून गुजरात पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title:  The accused found the lanterns of the sanitary latrine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.