फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपीला 2 वर्षे साधी कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 09:34 PM2020-12-24T21:34:02+5:302020-12-24T21:34:28+5:30

Crime News : 2018 मध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूकीच्या गुन्हयात अटक केली गेली होती.

Accused of fraud sentenced to 2 years simple imprisonment | फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपीला 2 वर्षे साधी कैद

फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपीला 2 वर्षे साधी कैद

Next
ठळक मुद्देया गुन्हयाचा समांतर तपास करणा-या पोलीस उपायुक्तांच्या तत्कालीन अँटी रॉबरी स्कॉडने शाह ला गुजरात येथील नाडीयाद येथून अटक केली होती.

कल्याण - घरात असणा-या वृध्द व्यक्तींना भांडी आणि दागिने पॉलिश करून देण्याचा बहाणा करून दागिने लंपास करणा-या आरोपीला कल्याणन्यायालयाने गुरूवारी 2 वर्षे 3 महिने साधी कैद आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोदप्रसाद मुकेशप्रसाद शाह वय 48 असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला 2018 मध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूकीच्या गुन्हयात अटक केली गेली होती.


या गुन्हयाचा समांतर तपास करणा-या पोलीस उपायुक्तांच्या तत्कालीन अँटी रॉबरी स्कॉडने शाह ला गुजरात येथील नाडीयाद येथून अटक केली होती. या गुन्हयाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे आरोपीने जानेवारी 2018 ते डिसेंबर 2020 या कालावधीत कल्याण न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायालय ते उच्च न्यायालयार्यंत पाच वेळा जामिनासाठी अर्ज  केला होता. परंतू न्यायालयाने जामिन नामंजूर केला होता. आरोपीवर असलेल्या इतर 13 गुन्हयात जामीन होऊनही फसवणूकीच्या गुन्हयात जामीन नामंजूर झाला होता. गुन्हयातील पुरावे व कागदपत्रंमुळे कोरोनाच्या परिस्थितीतही आरोपीला जामीन मिळाला नाही. अखेर गुरूवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील पहिले न्यायालयाने आरोपी शाह ला दोन वर्षे 3 महिने साधी कैद आणि 1 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास 5 दिवस साधी कैद शाह ला भोगावी लागणार आहे.

Web Title: Accused of fraud sentenced to 2 years simple imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.