मॉडेल हत्याप्रकरणी युरोपातून आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 09:31 AM2022-05-25T09:31:56+5:302022-05-25T09:32:16+5:30

इंटरपोलच्या मदतीने केले जेरबंद

Accused from Europe arrested in model murder case | मॉडेल हत्याप्रकरणी युरोपातून आरोपी ताब्यात

मॉडेल हत्याप्रकरणी युरोपातून आरोपी ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड  : काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गालगत २००३ मध्ये अमेरिकन मॉडेल  लिओन स्विडेस्की (३३) हिचा मृतदेह सापडला होता. तिचे अपहरण व हत्या प्रकरणातील आरोपी विपुल पटेल याला युरोपमधून इंटरपोलच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पथक युरोपला गेले असून २७ मे रोजी पोलीस आरोपीला घेऊन परतणार आहेत.

लिओन स्विडेस्की हिचे ८ फेब्रुवारी २००३ रोजी मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी तिचा मृतदेह काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अमेरिकन सरकारने हत्येची गंभीर दखल घेतली होती. एफबीआयचे  एक पथक त्यावेळी भारतात पाठवण्यात आले होते.  पोलिसांनी लिओनचा प्रियकर अनिवासी भारतीय प्रग्नेश देसाई व विपुल पटेल या दोघांना अटक केली होती. दोन आरोपी फरार होते.  फास्ट ट्रँकवर खटला चालून न्यायालयाचा निकाल एक वर्षात लागला. परंतु त्यात दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते. अमेरिकन सरकारने या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती. 

पोलीस पथक रवाना 
गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रग्नेश देसाई याला बडोद्यातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु विपुल पटेल हा इंग्लंडमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली.  इंटरपोलने शोध घेतला असता पटेल झेक रिपब्लिकमध्ये असल्याचे समजले. प्राग विमानतळावर इंटरपोलने पटेलला ताब्यात घेतले. आरोपीला आणण्यासाठी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्यासह  पथक रवाना झाले. २७ मे रोजी आरोपीला मायदेशी आणण्यात येईल.

Web Title: Accused from Europe arrested in model murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.