घरफोडी गुन्ह्यांतील आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By Appasaheb.patil | Published: March 28, 2023 01:52 PM2023-03-28T13:52:40+5:302023-03-28T13:53:05+5:30
या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्याकडे होता.
सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना २१ घरफोड्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपीला पकडले. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ग्रामीण पोलिसांनी वर्तविली आहे.
माळशिरस पोलीस ठाणे हद्दीत २९ एप्रिल २०२२ रोजी फिर्यादीच्या घरी बायपास रोड चौक, पिलीव येथील तक्रारदार याचे रात्री बंद घराचे खिडकीचे ग्रिल कापुन घरात प्रवेश करून अज्ञात आरोपी यांनी घरफोडी करून घरातील साडेचार लाख रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याने माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्याकडे होता.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाच्या तपासादरम्यान यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपीचा साथीदार पाहिजे आरोपी याचा वाखरी (ता. पंढरपूर) येथे शोध घेत होते. त्याचवेळी आरोपी हा वाखरी येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. मिळालेल्या महितीनुसार आरोपी हॉटेलसमोर आल्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे यांचे पथकातील राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, रवि माने समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, सुनंदा झळके, दिलीप थोरात यांनी बजावली आहे.