शालेय विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 00:06 IST2019-11-24T00:05:57+5:302019-11-24T00:06:15+5:30
तलासरीजवळ इभाडपाडा येथे ३ आॅक्टोबर रोजी महामार्गाजवळ तरुणीचा हत्या करून जाळलेला मृतदेह आढळला होता.

शालेय विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड
तलासरी : तलासरीजवळ इभाडपाडा येथे ३ आॅक्टोबर रोजी महामार्गाजवळ तरुणीचा हत्या करून जाळलेला मृतदेह आढळला होता. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस तपास करीत होते. या गुन्ह्याचा छडा कांदिवली पोलिसांनी लाऊन आरोपीस अटक केली आहे.
कांदिवली येथील १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनी सानिका शेषराव गोंड हिच्यावर तिच्या शेजारी राहणारा तरूण अजय अशोक बनोवंशी (२९) याने घरात बोलावून अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. यावेळी सानिकाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्याने अजयने तिचा गळा आवळून खून केला व तिचा मृतदेह बॅगेत भरून दुचाकीने तलासरीजवळ आणून महामार्गाजवळ खड्यात टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी पेटवून दिला होता.
नववीत शिकणारी सानिका घरातून बेपत्ता झाल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध करून कांदिवली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा ३६३ प्रमाणे गुन्हा २ आॅक्टोबरला दाखल केला होता. पोलीस चौकशी करत असताना त्या चौकशीत शेजारी राहणारा अजय याच्यावर संशय होता. पोलीस तपासाच्यावेळी अजय पोलिसांकडे हजर व्हायचा. अजयकडे दुसरा मोबाइल आढळला. त्याचे लोकेशन तलासरीत आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली.