बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 09:58 PM2022-02-28T21:58:48+5:302022-02-28T21:59:53+5:30

Pakistan Beheaded after rape:  बलात्कार करणाऱ्याचे कुटुंब पाकिस्तानमध्ये खूप श्रीमंत मानले जाते.

Accused of beheading after rape sentenced to death | बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

Next

Pakistan Beheaded after rape:  अमेरिकन नागरिक  जाहिर जफर  याने इस्लामाबादमधील एका तरुणीवर तिच्या घरी क्रूरपणे बलात्कार केला आणि धारदार शस्त्राने तिचा गळा कापला. याप्रकरणी आरोपी जहिर जफर याला गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जहिरचे वडील पाकिस्तानातील एका ट्रेडिंग कंपनीचे संचालक आहेत. बलात्कार करणाऱ्याचे कुटुंब पाकिस्तानमध्ये खूप श्रीमंत मानले जाते.

जफर नावाच्या व्यक्तीने राजनयिकाच्या मुलीचे शीर कापले. कारण तिने लग्नाला नकार दिला होता. २७ वर्षीय नूर मुकादम असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपीने 20 जुलै 2021 रोजी मुकादमची तिच्या इस्लामाबादच्या घरी हत्या केली. आरोपी जहीर हा अमेरिकन नागरिक आहे.



या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीश  अट्टा रब्‍बानी  म्हणाले, 'या प्रकरणातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.' त्याचबरोबर या प्रकरणात दोन्ही गार्ड यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी जफर जहीरच्या पालकांना क्लीन चिट मिळाली आहे.



पाकिस्तानमध्ये या प्रकरणाचा महिला कार्यकर्त्यांकडून जोरदार निषेध करण्यात आला. कारण, हे प्रकरण पाकिस्तानातील एका मोठ्या कुटुंबाशी संबंधित होते. अशा स्थितीत खटल्याबाबतही लोकांनी दबाव निर्माण केला होता. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या 'अस्मा जहांगीर लीगल एड सेल'च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये महिलांवरील हिंसाचाराच्या प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये मानवी हक्कांच्या प्रकरणांवरील अहवालानुसार, खोट्या प्रतिष्ठेसाठी दरवर्षी 1 हजारांहून अधिक महिलांची हत्या केली जाते.

काय म्हणाले नूर मुकद्दमचे वडील?
डेली मेलच्या वृत्तानुसार, नूर मुकद्दमचे वडील शौकत मुकादम म्हणाले की, "आम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला याचा आम्हाला आनंद आहे, परंतु आम्ही जफरच्या पालकांच्या शिक्षेसाठी अपील करणार आहोत." शौकत हे पाकिस्तानच्या दक्षिण कोरिया आणि  कजाकस्‍तानमध्ये मुत्सद्दी राहिले आहेत.

घटना सीसीटीव्हीत कैद
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ज्यामध्ये  मुकद्दम  घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते, मात्र कर्मचाऱ्यांनी तिला रोखले. मोठ्या गेटमुळे  मुकद्दम  पळून जाऊ शकली नाही.

Web Title: Accused of beheading after rape sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.