राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 06:25 PM2023-04-17T18:25:22+5:302023-04-17T18:26:17+5:30

२ गुन्ह्यांची उकल, वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

Accused of forced theft on national highway arrested | राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, 

नालासोपारा (मंगेश कराळे) :- मुंबई अहमदाबाद महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी सोमवारी दिली आहे. 

२१ मार्चला दोन वाजण्याच्या सुमारास मोहम्मद रिजवान मोहम्मद फारुख अन्सारी हे त्यांच्या ताब्यातील ओला कारने नालासोपारा फाटा येथुन गोल्डन चॅरिएट हॉटेल जवळ आले होते. दोन आरोपी त्यावेळी भेटले व त्यांनी फाऊंटन येथे सोडण्यास सांगितले. मोहम्मद रिजवान त्यांना घेऊन सातीवली ब्रीज जवळील सर्व्हिस रोडवर येथे आले असता त्यांचा मित्र येत असल्याने गाडी बाजुला घेण्यास सांगितले. त्यानंतर गाडीत बसलेल्या एका आरोपीने पाठीमागुन त्याचा गळा पकडला व त्याचेकडील असलेला चाकु गळयाला लावला व दुस­या आरोपीने त्याच्या खिशातील २० लाख रुपये काढुन घेतली.  त्यातील ५०० रुपये मोहम्मद रिजवानला परत देऊन पाठीमागुन आलेल्या दुचाकीवर बसुन निघुन गेले. तरुणाने पाठलाग केला असता ते गुजरात मुंबई महामार्गावरील वासमाऱ्या ब्रीजजवळ दिसुन आल्याने तरुणाने ताब्यातील गाडी आरोपीच्या मोटारसायकल समोर उभी केली असता त्याच्या गाडीला ठोकर मारल्याने दुचाकी खाली पडली व ते दुचाकी सोडुन सदर ठिकाणाहुन पळुन गेले. सदरबाबत वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद हायवेवर जबरी चोरीचे प्रमाणे वाढत असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे वालीव पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील बारकावे, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांचेकडुन प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी सरोज मारुफ आलम उर्फ सोनु (२६) याला अटक केली. पाहीजे आरोपीत आसीफ उर्फ मव्वा अकील अहमद आणि रप अब्दुल उर्फ कट्टा याचे मदतीने गुन्हे केले. अटक आरोपीकडुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्याचेकडुन दोन गुन्हे उघडकिस केले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे, बाळु कुटे, गजानन गरीबे, अभिजीत गढरी यांनी केली आहे.

Web Title: Accused of forced theft on national highway arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.