हद्दपारीचा आदेश मोडणाऱ्या आरोपीस अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:52 IST2022-05-26T17:51:11+5:302022-05-26T17:52:04+5:30
Accused of violating deportation order arrested : मुंबईसह तीन जिल्हयातून दोन वर्षांसाठी हद्दपार

हद्दपारीचा आदेश मोडणाऱ्या आरोपीस अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई
ठाणे : मुंबई उपनगरास ठाणे आणि रायगड जिल्हयाच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार केलेल्या सचिन सोनाजी शिंदे (३३, अंबिका नगर, वागळे स्टेट, ठाणे) या आरोपीला मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी गुरुवारी दिली. त्याच्यावर हाणामारीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.
सचिन शिंदे याला ठाणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई असतानाही तो मनाई आदेशाचे उल्लंघन करून अंबिका नगर परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच आधारे शिंदे यांच्या पथकाने त्याला २४ मे रोजी अंबिका नगर भागातून अटक केली. त्याला ठाण्यासह तीन जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपारीचे आदेश २६ फेब्रुवारी २०२० रोजी ठाणे पोलिसांनी काढले होते. त्यामुळे त्याच्यावर १४२ प्रमाणे कारवाई करुन वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक जोंधळे हे अधिक तपास करीत आहेत.