१५ वर्षे फरार आरोपी  टॅटूवरून जाळ्यात, मुंबई, गुजरातमध्ये गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 10:45 AM2023-03-24T10:45:21+5:302023-03-24T10:45:36+5:30

मुंबईतील भांडुप, अँटॉप हिल, सायन तसेच गुजरात येथील पोखारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे.

Accused on the run for 15 years nabbed over tattoo, crime in Mumbai, Gujarat | १५ वर्षे फरार आरोपी  टॅटूवरून जाळ्यात, मुंबई, गुजरातमध्ये गुन्हा

१५ वर्षे फरार आरोपी  टॅटूवरून जाळ्यात, मुंबई, गुजरातमध्ये गुन्हा

googlenewsNext

मुंबई : हाताच्या टॅटूवरून घरफोडीच्या गुन्ह्यात १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना यश आले आहे. आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र (६३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमुद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सपोनि महेश लामखडे, अंमलदार नारायण कदम,  सुरेश कडलग, लक्ष्मण निकम यांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केले होते.
आरोपीचा फोटो अभिलेखावर नव्हता. तसेच तो  वारंवार पत्ते बदलून कल्याण, माहीम, भांडुप तसेच कामाच्या ठिकाणी कोठेही राहण्यास असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पथकाला अडचणी निर्माण होत होत्या.

यादरम्यान, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘बदाम व क्रॉस’ या गोंदणांची नोंद आढळून आली. तोच धागा पकडून पथकाने तपास सुरू केला. खात्याअंतर्गत विविध ॲपवर समान नावाचे वेगवेगळे आरोपी दर्शवत होते. खबऱ्याकडून आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळवून विविध बँकांशी त्यावरून पत्रव्यवहार करून त्याचा फोटो  मिळविला. त्याने ते खातेदेखील वापरणे बंद केले होते. 

अशी केली अटक...
 तो वेगवेगळ्या प्रेक्षणीयस्थळी वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यातूनच तो ‘मुंबई दर्शन’ मार्गावर चालक म्हणून काम करत असल्याच्या शक्यतेतून शोध सुरू केला. 
  अखेर फोर्टस्थित ट्रॅव्हल एजन्सीला त्याची ओळख पटली. मुंबई दर्शनाचा प्लॅन असल्याचे सांगून देवेंद्रला बोलावून घेतले. 
 तो जाळ्यात अडकताच त्याच्यावर कारवाई केली. तो देवेंद्रऐवजी ‘मुदलीयार’ असा बदल करून वावरत होता. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान होते. 

मुंबई, गुजरातमध्ये गुन्हा
मुंबईतील भांडुप, अँटॉप हिल, सायन तसेच गुजरात येथील पोखारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे.

Web Title: Accused on the run for 15 years nabbed over tattoo, crime in Mumbai, Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक