नकोशीच्या आरोपी मातापित्याला पोलिसांनी केली अटक; टेंपोत सापडली होती नवजात बालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 04:20 PM2022-08-26T16:20:24+5:302022-08-26T16:20:42+5:30

बुधवारी पहाटे संतोष राजपूत (४७) हे त्यांच्या कुत्र्याला बाहेर फिरण्यासाठी घेऊन आल्यावर एका मालवाहू तीन चाकी टेंपोमध्ये कपड्यात गुंडाळलेले स्त्री जातीचे अर्भक टाकून देण्यात आल्याचे दिसून आले होते.

Accused parents arrested by police; A newborn girl was found in Tempo at nalasopara | नकोशीच्या आरोपी मातापित्याला पोलिसांनी केली अटक; टेंपोत सापडली होती नवजात बालिका

नकोशीच्या आरोपी मातापित्याला पोलिसांनी केली अटक; टेंपोत सापडली होती नवजात बालिका

Next

मंगेश कराळे 

नालासोपारा :- बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास अंबावाडी रोडवरील एका टेंपोमध्ये कपड्यात गुंडाळलेले नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने ४८ तासांच्या आत आरोपी माता पित्याला गुरुवारी रात्री अटक केले आहे. सदर प्रकरणी आरोपी आई ही अल्पवयीन असल्याने आरोपी पित्यावर बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंध लपवण्यासाठीच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बुधवारी पहाटे संतोष राजपूत (४७) हे त्यांच्या कुत्र्याला बाहेर फिरण्यासाठी घेऊन आल्यावर एका मालवाहू तीन चाकी टेंपोमध्ये कपड्यात गुंडाळलेले स्त्री जातीचे अर्भक टाकून देण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांनी तत्परता दाखवत तुळींज पोलीस ठाण्यात संपर्क साधून याची माहिती दिली होती. तुळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने जागोजागी असलेले सीसीटीव्ही तपासले. गुरुवारी रात्री आर के कॉलेजच्या परिसरातून अटक केली आहे. मुलीची आई ही अल्पवयीन असून आरोपी वडिलांचे वय २१ आहे. 

अनैतिक संबंध लपवण्यासाठी 

सदरचे नवजात स्त्री अर्भक अनैतिक संबंध लपवण्यासाठी संबंधित महिलेने हे अर्भक परिसरात सोडून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता तो खरा ठरला आहे. मुलीच्या आरोपी माता पित्याचे लग्न झालेले नाही. 

कोट

सदर प्रकरणी आरोपी पालकांना अटक केली आहे. आरोपी आई अल्पवयीन असून आरोपीविरोधात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यासाठी गुन्हा आचोळे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. - राजेंद्र कांबळे (पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)

Web Title: Accused parents arrested by police; A newborn girl was found in Tempo at nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.