लज्जास्पद! ६४ वर्षीय सासूवर जावयाने केला अत्याचार; जबरदस्ती दारु पाजल्याचाही आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 12:50 PM2021-01-05T12:50:54+5:302021-01-05T12:51:02+5:30

आर्वी येथील घटनेने खळबळ

The accused raped his mother-in-law in Wardha | लज्जास्पद! ६४ वर्षीय सासूवर जावयाने केला अत्याचार; जबरदस्ती दारु पाजल्याचाही आरोप

लज्जास्पद! ६४ वर्षीय सासूवर जावयाने केला अत्याचार; जबरदस्ती दारु पाजल्याचाही आरोप

Next

वर्धा : मद्यधुंद जावयाने ६४ वर्षीय वृद्ध सासूला जबरदस्ती दारू पाजून बळजबरी अत्याचार केल्याची घटना आर्वी शहरात घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून या लज्जास्पद घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.

वृद्धेची मुलगी आणि पती सचिन यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता. त्यामुळे वृद्धेची मुलगी नागपूर येथे तिच्या मोठ्या वडिलांकडे गेली होती. याचाच फायदा घेवून जावयी सचिन हा घरी आला त्याने वृद्धेच्या मुलाला पनीर आणण्यासाठी बाहेर पाठविले. घरी कुणी नसल्याचे पाहून जावयी सचिनने वृद्ध सासूला जबरदस्ती दारू पाजली. सासूने दारू पिण्यास नकार दिल्यावरही सचिनने जबरदस्ती दारू पाजली. काही वेळानंतर मुलगा पनीर घेवून घरी आला.

जावयी सचिनने स्वत:च्या हाताने पनीरची भाजी बनविली. त्यानंतर दोघांनी जेवण केले. सचिनने वृद्ध सासूच्या मुलाला पुन्हा खर्रा आणण्यासाठी बाहेर पाठविले. मुलागा घराबाहेर पडताच सचिनने वृद्ध सासूवर बळजबरी अत्याचार केला. मुलगा खर्रा घेवून आल्यावर सचिनने खर्रा घेवून निघून गेला. वृद्ध सासूने ही बाब दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाला सांगितली. तसेच नागपूर येथे गेलेल्या तिच्या मुलीला दुरध्वनीवरून संपर्क करून सांगितली. त्यानंतर वृद्ध सासूने याप्रकरणी आर्वी पोलिसांत धाव घेत जावयी सचिन वरूद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून ३७६.३७६ (२),(एन) या भादविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.

यापूर्वीही केला होता अत्याचार....

सचिन आणि वृद्धेच्या मुलीचा २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. जावयी सचिन हा सेंट्रींगचे काम करायचा. मात्र, दोघांमध्ये नेहमीच घरगुती कारणातून वाद व्हायचे. यापूर्वीही मुलगी बाहेरगावी गेली असता डिसेंबर २०१९ मध्ये जावयी सचिन याने घरात प्रवेश करून वृद्ध सासूवर बळजबरी अत्याचार केला होता. मात्र, बदनामी खातर वृद्धेने ही बाब कुणालाही सांगितली नव्हती. मात्र, पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने वृद्धने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The accused raped his mother-in-law in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.