नागपुरात  शेतकऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:11 PM2020-01-28T23:11:50+5:302020-01-28T23:13:27+5:30

चाकूच्या धाकावर शेतकऱ्याला लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात छडा लावला. दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन असल्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

Accused robbed of farmer in Nagpur arrested | नागपुरात  शेतकऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

नागपुरात  शेतकऱ्याला लुटणारे आरोपी जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देदरोड्याचा गुन्हा : १२ तासात छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चाकूच्या धाकावर शेतकऱ्याला लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाच्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात छडा लावला. दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन असल्यामुळे तिघांना ताब्यात घेऊन त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
भिलगाव येथील शेतकरी अरुण कवडूजी महाकाळकर (वय ५४) पहाटेच शेतात जाऊन भाजीपाला तोडतात आणि तो विकण्यासाठी ते भल्या सकाळी कळमना मार्केटमध्ये पोहचतात. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ते दुचाकीने जात असताना ऑटोमोटिव्ह चौक ते चिखली चौकादरम्यान दोन दुचाकींवर असलेल्या पाच आरोपींनी रोखले. त्यांना चाकूचा धाक दाखवून धक्काबुक्की करीत त्यांच्याकडची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले. लुटमारीमुळे व्यथित झालेल्या अरुण महाकाळकर यांनी कळमना मार्केट गाठले. तेथे दिवसभर भाजीपाला विकला अन् सायंकाळी यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपींचे वर्णन शहरातील अन्य पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. ते ऐकून कोतवाली ठाण्यातील पोलीस पथकाने गुन्हेगाराशी मिळत्याजुळत्या वर्णनाच्या एका संशयिताला काही वेळेतच ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन जरीपटका तसेच खापरखेड्यातील साथीदारांची नावेही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आणखी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील अभिजित नितीन नितनवरे (वय २१, रा. गौतमनगर, जरीपटका) तसेच आशिष ऊर्फ बाबू प्रेमसिंग (रा. खापरखेडा) या दोघांनाही अटक केली.

म्होरक्या सराईत गुन्हेगार
या टोळीचा म्होरक्या आरोपी नितनवरे आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीचे १७ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा केल्यानंतरही तो बिनधास्त फिरत होता. गुन्ह्याची तक्रार मिळाल्याच्या १२ तासात त्याच्या आणि साथीदारांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ ५ चे उपायुक्त नीलोत्पल, सहायक आयुक्त कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे ठाणेदार डी. बी. भोसले, डीबीचे सहायक निरीक्षक एन. व्ही. निस्वादे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जरीपटका ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी बजावली.

Web Title: Accused robbed of farmer in Nagpur arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.