तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्याची कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 04:31 PM2019-05-21T16:31:06+5:302019-05-21T16:32:28+5:30

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Accused sent to judicial custody who stone pelted on tapovan express | तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्याची कोठडीत रवानगी

तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्याची कोठडीत रवानगी

Next
ठळक मुद्देआरोपी मुस्ताफा इराणी याला कल्याण रेल्वे न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.. मुस्ताफाविरोधात तपोवन एक्स्प्रेसमधील एकाचा मोबाइल हिसकावल्याचा गुन्हाही कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.

डोंबिवली - आंबिवली रेल्वे फाटकानजीक तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी मुस्ताफा इराणी याला कल्याणरेल्वे न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुस्ताफा आणि अन्य एका अनोळखी आरोपीने तपोवन एक्स्प्रेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याआधारे मुस्ताफाला पुण्यातून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. मुस्ताफाविरोधात तपोवन एक्स्प्रेसमधील एकाचा मोबाइल हिसकावल्याचा गुन्हाही कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.
दरम्यान, दगडफेकप्रकरणी दुसरा संशयित आरोपी हा अद्याप फरारच आहे. त्याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी दिली. मुस्ताफानेही त्याच्याबाबत काही सांगितलेले नाही. आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके ठिकठिकाणी पाठवली आहेत.

Web Title: Accused sent to judicial custody who stone pelted on tapovan express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.