फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 09:21 AM2021-06-29T09:21:16+5:302021-06-29T09:51:35+5:30

याप्रकरणी दोघांना पवई पोलिसांनी दिल्लीमधुन अटक केली आहे.

The accused took lakhs of rupees from a senior citizen by sending a Facebook request to get vaccinated | फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास

फेसबुक रिक्वेस्ट पाठवत लसीकरणाचे करण्याचे दिले आमिष; वृद्धाकडून लाखो रुपये केले लंपास

Next

-गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: वृद्धाशी 'फेसबुक' वर मैत्री करत त्यांच्या नावाने लसीकरण करण्याचे आमिष दाखवत  लाखो रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी दोघा भामट्यांना पवई पोलिसांनी दिल्लीमधुन अटक केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायीक असुन त्यांना आरोपींनी काही दिवसांपूर्वी 'फेसबुक' वर रिक्वेस्ट पाठवत त्यांच्याशी मैत्री केली. ते एका एनजीओचे प्रतिनिधी आहेत अशी ओळख करून दिली होती. त्यांच्यात मैत्री वाढल्यानंतर तक्रारदार राहत असलेल्या परिसरात लसीकरण करण्याचा प्रस्ताव टोळक्याने त्यांच्यासमोर ठेवला. त्यासाठी काही रकमेची देखील मागणी केली.

सदर लसीकरण हे तक्रारदाराच्या नावाने करण्यात येईल असेही सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन २० लाख रुपये पाठविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात लसीकरण करण्यात आलेच नाही. तसेच पैसे मिळाल्यानंतर एनजीओ म्हणवणाऱ्यांनी त्यांना संपर्कही केला नाही. त्यामुळे तक्रारदाराला संशय आला आणि त्याने पवई पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनवणे यांना विचारले असता ३ लाख ४७ हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यात आले असुन आरोपीला रिमांडसाठी पाठविण्यात आल्याचे 'लोकमत' शी बोलताना सांगितले. मात्र या प्रकाराबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. दरम्यान पवई पोलिसांनी दोघांना याप्रकरणी अटक केली असुन अधिक तपास सुरू आहे. 

चांगल्या कामासाठी गिफ्ट

काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने लसीकरणासाठी पैसे देऊन सामाजिक काम केले आहे आणि त्यासाठी त्यांना एक भेट वस्तू एनजीओकडून दिली जात आहे असेही।त्यांनी तक्रारदाराला सांगितले. ही भेटवस्तू त्यांना दिल्ली विमानतळावर दिली जाईल असे सांगत याबाबतही त्यांना चुना लावल्याची माहिती असून अद्याप पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

Web Title: The accused took lakhs of rupees from a senior citizen by sending a Facebook request to get vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.