उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 04:54 PM2021-10-28T16:54:51+5:302021-10-28T16:55:24+5:30

Accused arrested who torturing widow victim :युपीमधील सलोन पोलिसांना २ वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागत  नव्हता.

Accused of torturing widow victim in Raebareli, Uttar Pradesh arrested in Bhiwandi | उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत 

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील विधवा पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी भिवंडीत अटकेत 

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान मो. शाह (वय २६ वर्ष ) असे अटक केलेल्या फरार आरोपीच नाव आहे. 

भिवंडी -  उत्तरप्रदेश राज्यातील रायबरेली हद्दीतील  एका २६ वर्षीय विधवा पीडितेवर बळजबरीने बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला शांतीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. सलमान मो. शाह (वय २६ वर्ष ) असे अटक केलेल्या फरार आरोपीच नाव आहे. 

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील सलोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय पीडित विधवा महिलेवर नराधम सलमान याने जबरदस्तीने अत्याचार केला होता. आरोपी व पीडित विधवा महिला एकाच परिसरात रहात असल्याने पीडितेशी त्याची ओळख होती. त्यातच लॉकडाऊनपूर्वी पीडीतेच्या पतीचे निधन झाल्याने याचा फायदा घेत आरोपी सलमानने तिच्याशी जवळकी साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांमध्ये वर्षभर प्रेमसंबंध सुरु असतानाच गेल्यावर्षी तिला ठार मारण्याची धमकी देऊन  तिच्यावर बळजबरीने बलात्कार करून आरोपी सलमान पसार झाला होता. त्यावेळी याप्रकरणी सलोन पोलीस ठाण्यात सलमान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत युपी पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. 

             

युपीमधील सलोन पोलिसांना २ वर्षांपासून आरोपीचा ठावठिकाणा लागत  नव्हता. त्यातच सलोन पोलिसांना काही दिवसापूर्वीच आरोपी सलमानचा मोबाईल नंबर मिळाला असता, त्याचे मोबाईल लोकेशन भिवंडीत येत असल्याचे आढळून आले. त्यांनतर भिवंडी पोलिसांशी संपर्क करून आरोपीचा नंबर व वर्णन शांतीनगर पोलिसांना दिले. या आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस हवलदार प्रसाद काकड, श्रीकांत पाटील या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला असता शांतीनगर पोलीस पथकाला दोन दिवसापूर्वीच आरोपी गैबीनगर भागातल्या एका लूममध्ये कामगार म्हणून काम करीत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे मोबाईल लोकेशन दाखवत असलेल्या लूम कारखान्याच्या परिसरात पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यांनतर सलोन पोलीस ठाण्याशी संपर्क करून आरोपी ताब्यात असल्याची माहिती मिळताच सलोन पोलीस ठाण्याचे एक पथक शांतीनगरमध्ये बुधवारी दाखल झाले असता आरोपी सलमानला त्याच्या स्वाधीन केले आहे. 

Web Title: Accused of torturing widow victim in Raebareli, Uttar Pradesh arrested in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.