१० किलो गांजा, ८० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:55 PM2021-08-11T17:55:27+5:302021-08-11T18:00:49+5:30
Dacoity Case : शांतीनगर पोलिसांकडून तीन गुन्ह्यांची उकल
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कृत्य होत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली एकूण तीन गुन्ह्यांची उकल करीत दहा किलो गांजा, एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसांसह चोरीस गेलेला ८० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळविले असल्याची माहिती बुधवारी शांतीनगर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत आमपाडा शानदार मार्केट येथे सोहेल शेख नामक व्यक्ती आपल्या साथीदारासह गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली शानदार मार्केट येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या मोटारसायकल वरील थैलीत दोन पॅकेट मध्ये २ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचा १० किलो ३९० ग्रॅम गांजा व दुचाकी मोबाईल असा एकूण २ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या गुन्ह्यात टेमघर येथील गोरखनाथ अंकुश म्हात्रे यांनी सार्वजनिक रस्त्यालगत आपल्या जवळील ९० ग्रॅम वजनाचे दागिने आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुचाकी उभी करून ठेवली असता आरोपी अनिल पाल याने सदर दुचाकी चोरी केली होती. या बाबत २ लाख १५ हजार रुपयाच्या चोरी बाबत गुन्हा दाखल असताना पोलिसांनी तांत्रिक तपासा द्वारे माहिती मिळवून रांची रा.झारखंड येथून आरोपीस ताब्यात घेऊन ८० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
तर तिसऱ्या गुन्ह्यात शांतीनगर भाजीमार्केट येथील मन्नत गोल्ड या सोने विक्री च्या दुकानात रात्री साडेनऊ वाजताच्या चांदीची अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने आलेल्या ग्राहकाने दुकानदार अंगठी दाखवीत असताना आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर दुकानदाराच्या गळ्याला लावून त्या कडील सर्व दागिने चोरीचा प्रयत्न केला असता या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस शिपाई श्रीकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस निशस्त्र करून आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळून एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात यश मिळविले आहे . पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत ,पो निरीक्षक किरणकुमार काबाडी ,नितीन पाटील ,विक्रम मोहिते यांच्या नेतृत्वखाली पो उप निरी रवींद्र पाटील,निलेश जाधव,बडगिरे ,पोलीस पथकातील शेळके ,चौधरी,वडे, इथापे, सैय्यद, वेताळ,काकड,मोहिते, जाधव,श्रीकांत पाटील ,इंगळे,पाटील,सानप या पथकाने ही कारवाई केली आहे.