खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 09:34 PM2020-09-07T21:34:15+5:302020-09-07T21:36:33+5:30
सर्वात लज्जास्पद गोष्ट म्हणजे हा हत्येचा थरार पोलिसांच्या डोळ्यांदेखत घडला.
लखनऊ - उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. एका शिक्षकाच्या हत्येच्या आरोप असलेल्या व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्याला मरेपर्यंत मारहाण केली. सर्वात लज्जास्पद गोष्ट म्हणजे हा हत्येचा थरार पोलिसांच्या डोळ्यांदेखत घडला.
कुशीनगरच्या रामपूर बंगला परिसरातील रहिवासी असलेले शिक्षक सुधीर सिंह यांची त्यांच्या राहत्या घरातच हत्या करण्यात आली होती. हत्येच्या आरोपीने जमावाच्या भीतीखातर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायचे असल्याचं सांगितले. मात्र, गावकरांना प्रचंड संताप आला होता. संताप अनावर झाल्याने त्यांनी पोलिसांसमोरच आरोपी तरुणाची बेदम मारहाण करत हत्या केली. पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी गावकऱ्यांना रोखण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्नही केला. मात्र, संतापलेल्या गावकऱ्यांची संख्या खूप असल्याने पोलीस देखील आरोपीला वाचवू शकले नाही. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ देखील उघड झाला आहे. व्हिडिओमध्ये पोलीस गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करताना त्या व्हिडिओत दिसत आहेत. मात्र, रागाच्या आवेशात गावकऱ्यांनी पोलिसांसमोरच आरोपीला मारहाण करत आहेत.
पोलिसांनी जमावाकडून हत्या करण्यात आलेला तरुण गोरखपूरचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानं आपल्या वडिलांच्या बंदूकीतून एका शिक्षकाची हत्या केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाला गोळ्या घातल्यानंतर आरोपी तरुण घराच्या छतावर चढला आणि आपली बंदूक गावकऱ्यांवर रोखून त्यांना दूर होण्याची धमकी दिली. ही माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. गावकऱ्यांपासून बचाव करण्यासाठी तरुणाने आत्मसमर्पण करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस त्याला गाडीकडे घेऊन जात असतानाच गावकऱ्यांनी त्याला रस्त्यात गाठून आपल्या ताब्यात घेतलं आणि मरेपर्यंत बेदम मारहाण केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक
फ़ुटबॉलपटूविरोधात खळबळजनक आरोप, मुंबईतील तरुणीने केली बलात्काराचा तक्रार
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!