NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला मिळाला जामीन 

By पूनम अपराज | Published: September 28, 2020 03:06 PM2020-09-28T15:06:07+5:302020-09-28T15:10:00+5:30

एनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली.

The accused was granted bail as the NCB did not file the chargesheet on time | NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला मिळाला जामीन 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला मिळाला जामीन 

googlenewsNext
ठळक मुद्देशिवमचे वकील अय्याज खान यांचे म्हणणे आहे की, तीन प्रकरणांमध्ये एनसीबीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता, तर चौथ्या प्रकरणात १८० दिवसांनी आरोपपत्र दाखल केले होते.

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या दिवसांमध्ये चर्चेत आहे. आरोपपत्र वेळेवर दाखल करता न आल्याने आरोपींना ड्रग्स प्रकरणात जामीन मिळाला. शनिवारी कोर्टाने हा जामीन एक लाख रुपयांच्या बॉन्डवर मंजूर केला आहे. वास्तविक, अंधेरी येथे राहणारा शिवम पियुष ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आला. एनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली.

शिवमचे वकील अय्याज खान यांचे म्हणणे आहे की, तीन प्रकरणांमध्ये एनसीबीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता, तर चौथ्या प्रकरणात १८० दिवसांनी आरोपपत्र दाखल केले होते. पण त्यापूर्वी आम्ही जामीनाचा अर्ज दाखल केला होता. वकिलाच्या म्हणण्यानुसार एनसीबीने केलेल्या युक्तिवादावर न्यायाधीश समाधानी नव्हते. बर्‍याच विधानांचे सूर मिळत नव्हते, एनसीबीने कोरोना आणि इतर प्रकरणांमध्ये व्यस्त असल्याचा हवाला कोर्टाला दिला. एनसीबीने मार्चमध्ये या प्रकरणात अटक केली होती आणि हजारो ड्रग्ज जप्त केले होते. एनसीबीने ही कारवाई अंधेरी येथे छापा मारला त्यावेळी केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज यूके, सिंगापूर, आयर्लँड यासारख्या देशांतून आणली जात होती आणि तिथेही पाठविली जात होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशिवाय एनसीबीची टीम अद्याप बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या मुद्दय़ावर चौकशी करत आहे. याच कारणाने गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी देशभरात चर्चेत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Web Title: The accused was granted bail as the NCB did not file the chargesheet on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.