पोलिसांवरील खूनी हल्ल्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद; तीन वर्षांपासून पोलिसांना देत होते गुंगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:21 PM2020-07-16T13:21:33+5:302020-07-16T13:28:02+5:30
शेकरू प्राण्याच्या तस्करी संबंधी कारवाई करताना झाला होता स्थानिकांकडून हल्ला
राजगुरूनगर: तीन वर्षांपूर्वी खेड पोलीस ठाण्यातील पोलीस पथक दारूच्या हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी शिरगाव (ता. खेड ) येथे गेले होते. ३ लाख किमतीच्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तस्करीसाठी आणला आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यावरही कारवाई करण्यात आली असता तेथील स्थानिकांनी पोलिसांवर खुनी हल्ला केला म्हणुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. हा खुनी हल्ल्यात एकूण सात पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. रघुनाथ दामु वाघ ( वय ४५ )संतोष रघुनाथ वाघ (वय २१ ) सखाराम दामु वाघ (वय ४७ ) हे सर्व (रा. विठ्ठलवाडी, शिरगाव, ता. खेड ) हे गावी आल्याचे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाला समजले होते .ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलिस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, दीपक साबळे,अक्षय जावळे यांच्या पथकाने केली आहे.