अल्पवयीन पिडीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पंजाबमधून ४ वर्षानंतर घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 05:52 PM2023-06-21T17:52:09+5:302023-06-21T17:52:36+5:30
वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : २१ ऑक्टोबर २०२० साली अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चार वर्षांनंतर वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी ताब्यात पंजाब राज्यातून ताब्यात घेण्यात यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी बुधवारी दिली आहे.
सातीवली परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानाचा फायदा घेवुन तिला कशाचे तरी आमिष दाखवून फुस लावुन पळवून नेल्याची घटना २०२० साली घडली होती. मुलीच्या घरच्यांनी वालीव पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर २०२० साली तक्रार देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाचे तपासादरम्यान गुन्हयातील अपहरण झालेल्या मुलीला आरोपी राजा रामबीर यादव याने फुस लावुन पळवुन नेले बाबत निष्पन्न झाले होते. या गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे वारवांर आरोपीत याचे मुळ गावी जावुन आरोपी व अपहरीत मुलीचा शोध घेत होते. परंतु आरोपी व अल्पवयीन मुलीबाबत काहीएक माहिती मिळुन येत नव्हती व आरोपीत हा गुन्हा केल्यापासुन त्याचे नातेवाईक अथवा मित्र मंडळी यांचे कोणाचेही संपर्कात नसल्याने गुन्हयाची उकल होत नव्हती. गुन्हयातील अपहरीत मुलगी व आरोपीत हे जवळपास गेले ४ वर्षापासुन मिळुन येत नव्हते.
गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील आरोपीत हा त्याचा भाऊ सन्नी यादव याचे संपर्कात असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपी याचा भाऊ सन्नी यादवला त्याचे मुळ गावी जावुन ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास करणे गरजेचे असल्याने वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी फिरोजाबाद येथे जावुन सन्नी यादवला ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचा तपास करता त्याने त्याचा भाऊ आरोपी राजा यादव व गुन्हयातील अपहरीत अल्पवयीन मुलगी असे कामासाठी पंजाब येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने आरोपीच्या भावाला सोबत घेवुन त्याने दिलेल्या माहितीचे आधारे पंजाब येथे जावुन आरोपीचा शोध घेतला. पंजाबच्या धरमनगरी येथे आरोपी राजा यादव आणि अपहरण झालेली मुलगी वास्तव्य करीत असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले- श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, अभिजीत गढरी, विनायक राऊत, प्रियंका पवार यांनी केली आहे. यांनी पार पाडली आहे.