दुचाकी, रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला अटक; ४ गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 02:00 PM2024-04-23T14:00:38+5:302024-04-23T14:00:38+5:30
पोलिसांनी आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल करून २ लाख रुपये किंमतीचे ३ दुचाकी आणि १ रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा : दुचाकी आणि रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल करून २ लाख रुपये किंमतीचे ३ दुचाकी आणि १ रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
नायगांवच्या टीवरी रोडवरील भामनी संकुल येथे राहणारे दिलीपकुमार मकवाना (४३) यांची नायगांव रेल्वे स्टेशन जवळील सार्वजनिक रस्त्यावर पार्किंग केलेली दुचाकी १६ एप्रिलला चोरीला गेली होती. त्यांच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मेहनत घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे, बातमीदार आणि तांत्रिक मदतीने आरोपी मोहम्मद सैयाज मनिहार (२४) याला राहत्या घराच्या बावशेतपाडा परिसरातून सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासा दरम्यान अटक आरोपीकडून २ लाख रुपये किंमतीचे ३ दुचाकी आणि १ रिक्षा हस्तगत करून चार गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळाले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, प्रविण कांदे, गोविंद लवटे, आनंदा गडदे, पुजा कांबळे यांनी केली आहे.