अपहरण झालेल्या मुलीचा ४८ तासांत आचोळे पोलिसांनी लावला शोध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 03:48 PM2023-08-20T15:48:28+5:302023-08-20T15:49:48+5:30

अपहरण झालेल्या मुलीचा ४८ तासांत आचोळे पोलिसांनी लावला शोध!

Achole police found the kidnapped girl in 48 hours! | अपहरण झालेल्या मुलीचा ४८ तासांत आचोळे पोलिसांनी लावला शोध!

अपहरण झालेल्या मुलीचा ४८ तासांत आचोळे पोलिसांनी लावला शोध!

googlenewsNext

- मंगेश कराळे

नालासोपारा - आचोळे येथील आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा कोणताही ठावठिकाणा किंवा संपर्क नसताना आचोळे पोलिसांनी त्या मुलीचा सलग ४८ तास तपास व शोध लावून तिची सुखरूप सुटका केली आहे. त्या मुलीला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती आचोळे पोलिसांनी दिली आहे.

आचोळे डोंगरी येथील आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ४ जुलैला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले यांनी बराच शोध घेतला पण ती मुलगी भेटलीच नाही. तिचे वडील मुलगी मिळत नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वारंवार तक्रार करत होते. त्यामुळे आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तो गुन्हा महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा पाटील यांच्याकडे तपासासाठी दिला. 

त्यांनी मुलगी राहत असलेल्या घरापासून परत गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पेन येथे जाऊन स्वतः साक्षीदारांचा शोध घेऊन तपास केला. मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचे सिडीआर व टॉवर लोकेशन काढून तांत्रिक विश्लेषण करून मुरबाड व टोकावडे येथील गावात शोध सुरू केला. टोकावडेच्या माल गावातील खेड्यात जाऊन शोध घेतला. कुडवली एमआयडीसी परिसरातील १५० कंपन्यात पीडित मुलीचा शोध घेतला पण ती सापडली नाही. त्याच परिसरात स्वस्तात भाड्याने घर मिळत असल्याने सुमारे ७० रुम चेक केल्यावर अपहरण झालेली मुलगी मिळून आली.  एका मुलीसोबत मैत्री होती पण आईला आवडत नसल्याने तिचे आईवडील पुढील शिक्षणासाठी गावाला पाठवणार होते पण घरातून निघून गेल्याचे पोलिसांना विचारपूस केल्यावर तिने सांगितले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त पौणिमा श्रींगी- चौगुले, सहपोलीस आयुक्त विनायक नरळे, आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखा पाटील, पोलीस अंमलदार शिवराम शिंदे यांनी अपहरण मुलीचा कोणताही ठावठिकाणा अथवा संपर्क करतांना शोध घेवून यशस्वीरित्या कामगिरी करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

Web Title: Achole police found the kidnapped girl in 48 hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.