पूर्ववैमनस्यातून १६ वर्षीय विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:36 PM2019-12-23T22:36:31+5:302019-12-23T22:39:51+5:30
याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने खळबळ उडाली.
मुंबई - कांजूर मार्ग पश्चिमेकडील बाजीप्रभू देशपांडे मनोरंजन गेटसमोर मॉर्निंग वॉक करत असताना १६ वर्षीय मुलीवर व्यक्तीने अॅसिड हल्ला केला. ही घटना काल सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याने खळबळ उडाली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुलीच्या वडिलांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ वर्षीय मुलगी कांजूरमध्ये रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना प्राध्यापकाने तिच्यावर अॅसिड फेकले. तेथून ते मुलीला घेवून सायन, राजावाडी रुग्णालयात गेले. पार्कसाईट पोलिसांनी तात्काळ त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तपासाअंतीच यामागील सत्य समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दोघेही एकमेकांना ओळखतात. त्यात, यापूर्वी संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल आहेत. मुलीवर व्यक्तीने अॅसिड फेकून तिला गंभीर दुखापत केली. तसेच सलीम मोहम्मद शेख या फिर्यादिस, त्यांच्या पत्नीस व मुलांना अॅसिड फेकून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भा. दं. वि. कलम- 326 (ब), 506 (2), 34 अन्वये पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.