खळबळजनक! पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला, २३ जण जळाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:23 PM2020-08-28T23:23:23+5:302020-08-28T23:25:08+5:30

झांसीच्या  उल्दन पोलिस स्टेशन परिसरातील बासर गावात पाणी भरण्याच्या वादात एका बाजूच्या लोकांनी अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला, त्यात गावातील 23 जण जळाले आहेत. 

Acid attack over disputed on water in villeage of uttar pradesh, 23 people burn | खळबळजनक! पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला, २३ जण जळाले 

खळबळजनक! पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला, २३ जण जळाले 

Next
ठळक मुद्देघटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. या घटनेसाठी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशात अ‍ॅसिड हल्ल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. झांसीच्या  उल्दन पोलिस स्टेशन परिसरातील बासर गावात पाणी भरण्याच्या वादात एका बाजूच्या लोकांनी अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला, त्यात गावातील 23 जण जळाले आहेत. 


जळलेल्या पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी झांसी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. उल्दन  पोलिस स्टेशन हद्दीतील बासर गावात रात्री उशिरा पाण्यावरून दोन गटात वाद झाला, एका बाजूच्या लोकांनी घराच्या छतावर जाऊन अ‍ॅसिडने दुसर्‍या बाजूच्या लोकांवर हल्ला केला. या अ‍ॅसिड हल्ल्यात सुमारे 23 जण भाजले आहेत. हे पाहून गावात अराजक वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्व भाजलेल्या लोकांना उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल केले, ज्यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पाच जणांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेसाठी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

Web Title: Acid attack over disputed on water in villeage of uttar pradesh, 23 people burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.