गोव्यात अंमली पदार्थ तस्करांविरोधात पुन्हा कारवाई, महाराष्ट्रातील दोघा संशयितांना अटक
By काशिराम म्हांबरे | Published: February 2, 2024 01:04 PM2024-02-02T13:04:32+5:302024-02-02T13:04:52+5:30
काल गुरुवारी हडफडे येथे केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील दोघा संशयितांना अटक केली आहे.
म्हापसा : पोलिसांकडून अंमली पदार्थाच्या तस्करा विरोधात सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत आठवडाभरात किनारी भागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून चौघांना अटक केली आहे. काल गुरुवारी हडफडे येथे केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील दोघा संशयितांना अटक केली आहे.
हणजुण पोलिसांनी तीन दिवसात दुसरी कारवाई करुन बागा- हडफडे येथील चॅपेलजवळ मारलेल्या छाप्यात ५ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा ५५.६६ ग्राम वजनाचा हेरॉईन जप्त केला आहे. केलेल्या कारवाईत सुरेश काळे ( वय ३७, सोलापूर महाराष्ट्र) आणि सुबान शेख ( वय ४५, मुंबई ) या संशयितांना अटक केली आहे. निरीक्षक प्रशल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ग्राहकाच्या प्रतिक्षेत असताना ही कारवाई करण्यात आल्याचे देसाई म्हणाले.
३० जानेवारी रोजी हणजूण पोलिसांनी सिसिरा नायक या तस्कराकडून ५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. तर२८ जानेवारी रोजी कळंगुट पोलियांनी इब्राहीम पस्तूनी या संशयिताकडून ९२ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. मागील तीन दिवसात हणजुण पोलिसांकडून १० लाख ४५ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तर आठवडाभरातील कारवाईत एकूण ११ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा अंमदी पदार्थ जप्त करण्यात आला आहे.