कल्याण डोंबिवलीत ६७ तळीराम वाहनचालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 05:28 PM2021-01-01T17:28:26+5:302021-01-01T17:29:27+5:30
Crime News : वाहन चालवण्यास प्रवृत्त करणाऱ्या २१ जणांवर कारवाई
डोंबिवली - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मद्य प्राशनकरून वाहन चालवणाऱ्या ६७ वाहन चालकांवर कल्याणडोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत ६ कारवाई केली. त्यामध्ये कल्याणच्या ३१, डोंबिवलीच्या ३६ वाहनचालकांचा समावेश असून दुचाकी, चारचाकी वाहनचालक आणि त्याना वाहन चालवण्यास प्रवृत्त करणार्यां २१ जणांचा समावेश आहे.
कल्याण शहर हद्दीमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकूण २४ वाहन चालकांवर तसेच दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या एकूण ७ जणांवर कारवाई करण्यात आली. अश्याप्रकारे एकूण ३० दुचाकी , एक चारचाकी कारवाई करून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. येथील दुर्गाडी किल्ला नजीकचा चौक, महात्मा फुले चौक, सुभाष चौक रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू होती. वाहतूक कल्याण उपविभाग प्रभारी पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, दोन अधिकारी, ८ पोलीस हवालदार, १० पोलीस नाईक, ४ पोलीस शिपाई आणि ८ वॉर्डन यांनी सदरची कामगिरी केली.
त्याच कालावधीत डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून डोंबिवली शहर हद्दीमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकूण ३६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या एकूण १४ जणांवर कारवाई करण्यात आली. अशा एकूण ४४ दुचाकी , ०२ चारचाकी आणि ०४ रिक्षांवर कारवाई करून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. डोंबिवली हद्दीतील रामनगर, शेलार नाका, शिवाजी नगर उद्यायोग चौकी, बावनचाळ, महात्मा फुले चौक, रेल्वे स्टेशन परिसर येथे करण्यात आली. डोंबिवली वाहतूक उप विभाग प्रभारी राजश्री शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५ अधिकारी, १० पोलीस हवालदार, ७ पोलीस नाईक, ६ पोलीस शिपाई आणि ९वॉर्डन यांनी सदरची कामगिरी केल्याचे शिंदे यांनी सांगितले.