रस्त्यावर अश्लिल चाळे करणाऱ्या महिलांवर कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:03 PM2019-08-07T15:03:47+5:302019-08-07T15:04:46+5:30

आतापर्यंत बुधवार पेठेतील वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून अश्लिल चाळे करणाऱ्या ८ महिलांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे़..

Action against indecent women on the street | रस्त्यावर अश्लिल चाळे करणाऱ्या महिलांवर कारवाई 

रस्त्यावर अश्लिल चाळे करणाऱ्या महिलांवर कारवाई 

Next
ठळक मुद्देएका आठवड्यात ८ महिलांना अटक            

पुणे : शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून अश्लिल चाळे  करुन पुरुषांना आकर्षित करुन वेश्या व्यवसाय करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहे़.  याबाबत फरासखाना पोलिसांनी एक वेगळे पाऊल उचलले असून भडक मेकअप करुन रस्त्यावर उभे राहून अश्लिल चाळे करणाऱ्या महिलांवर कलम २९४ अन्वये कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे़. या आठवड्यात अशा ८ महिलांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे़. 
बुुधवार पेठेत अनेक महिला रस्त्यावर उभ्या राहून वेश्या व्यवसाय करत असतात़. त्यामुळे अशा रस्त्यावरुन जाण्यास महिला तसेच पुरुषही टाळतात़. या महिला भडक मेकअप करुन शरिराचा काही भाग अर्धवट उघडा ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहून हातवारे करणे व अश्लिल चाळे करतात़ अनेकदा अश्लिल बोलताना आढळून येतात़. 
याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले की, या परिसरात न राहणाºया काही महिला बुधवार पेठेत रस्त्यावर थांबून वेश्या व्यवसाय करीत असल्याचे अनेकदा दिसून आले़. त्यामुळे सार्वजनिक शांततेला बाधा येत असल्याने यापूर्वी पोलिसांनी अनेकदा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़. मात्र, त्याचा पुरेसा परिणाम दिसून येत नव्हता़ त्यामुळे २९४ कलमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे़. या आठवड्यात आतापर्यंत बुधवार पेठेतील वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून अश्लिल चाळे करणाऱ्या ८ महिलांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे़. या महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे़. बुधवार पेठेतील या बदनाम गल्लीत अशा महिलावर सहजपणे दिसून येतात़. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहराच्या अनेक भागात सायंकाळनंतर असे प्रकार होत असल्याचे दिसून येते़. 

Web Title: Action against indecent women on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.