खैराची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, तिघांना अटक; मुद्देमाल केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:37 AM2020-10-30T00:37:35+5:302020-10-30T00:38:16+5:30

Crime News : अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वनक्षेत्रपाल इच्छात कांबळी यांनी खैराची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीवर तांबडी चेका येथे कारवाई केली

Action against Khaira smugglers, three arrested; Items confiscated | खैराची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, तिघांना अटक; मुद्देमाल केला जप्त

खैराची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई, तिघांना अटक; मुद्देमाल केला जप्त

Next

बोर्ली-मांडला : जंगलतोडीवर अंकुश ठेवण्याचे काम शासनाचे वनखाते करीत असते. महिना हजारो रुपये मोजून अधिकारी व कर्मचारी यासाठी तैनातही करण्यात आले आहेत. मुरूड तालुक्यात खैराची तोड होत असल्याची महिती परिसरातील नागरिकांनी वनविभागाला दिली. त्यानुसार वनविभागाने कारवाई केली.
अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वनक्षेत्रपाल इच्छात कांबळी यांनी खैराची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीवर तांबडी चेका येथे कारवाई केली. कृपेश चव्हाण (रा. राणेची वाडी), निरज जयरवाल (गाडी चालक-मालक) खैराची बेकायदेशीर तोड करणारा अमित शेळके (राहणार आदाड) यांनी मुरूड व रोहा परिसरात खैराची तोड केली. यांच्याकडून सोलीव नग ४०  रुपये प्रमाणे ८,३४१ व पिकअप असा माल जप्त करण्यात आला. पुढील तपास वनपाल विजय कोसबे, वनरक्षक फिरते पथक अजिंक्य कदम, वनरक्षक सचिन मानकर, वनरक्षक सत्तशील गोरड, वनरक्षक गोविंद माळी, निर्मूलन अतिक्रमण पथकाचे वनक्षेत्रपाल ईच्छात कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची टीम करीत आहे.

Web Title: Action against Khaira smugglers, three arrested; Items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.