फटाका हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकींवर कारवाई, २४ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 10:25 PM2023-04-10T22:25:26+5:302023-04-10T22:26:01+5:30

विना हेल्मेट गाडी चालविणे, विना सिटबेल्ट, विनापरवाना वाहन चालविणार्‍या तब्बल ४ हजार ८५८ जणांविरुध्द वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारून २२ लाखांचा दंड वसूल केला.

Action taken against two-wheelers blowing firecracker horn, 24 persons booked | फटाका हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकींवर कारवाई, २४ जणांवर गुन्हे दाखल

फटाका हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकींवर कारवाई, २४ जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

यवतमाळ - आपल्या दुचाकी गाड्यांना माडीफाय करणे आणि त्यांना मोठा हॉर्न बसवणे ही जणू फॅशनच बनली आहे. गाड्यांवर कधी नंबरप्लेटवर नावाचा उल्लेख करणे असो किंवा वेगळ्याच पद्धतीचा हॉर्न बसवणे असो, साध्या गाडीला बुलेट हॉर्न वा, बुलेट गाडीला फटका हॉर्न बसवून लोकांचे आकर्षण आपल्याकडे खेचणे हा ट्रेंड काही दुचाकी शौकिनांकडून सुरू असतो. मात्र, यवतमाळपोलिसांनी या दुचाकीस्वारांना चांगलाच धडा शिकवला आहे. भरधाव वेगात धावणार्‍या दुचाकी, बुलेटचे सायलेंन्सर बदलून फटाका फोडणार्‍या वाहनचालकांविरुध्द येथे २४ जणांवर केसेस करण्यात आल्या आहेत. 

विना हेल्मेट गाडी चालविणे, विना सिटबेल्ट, विनापरवाना वाहन चालविणार्‍या तब्बल ४ हजार ८५८ जणांविरुध्द वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारून २२ लाखांचा दंड वसूल केला. भरधाव धावणार्‍या व बुलेटचे सायलेन्सर बदलवून कर्कश आवाज करणार्‍या २४ जणांविरुद्घ केसेस करण्यात आल्यात. त्यांच्याकडून २४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, विना परवाना वाहन चालविणार्‍या चार हजार ८५८ चालकांवर केसेस करून २२ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, मद्य प्राशन, मोबाइलवर बोलणे आदी प्रकरणी जागृती होण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. 

दरम्यान, पालकांनी लहान मुल्यांच्या हाती वाहने देऊ नये, अन्यथा पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी दिला आहे.
 

Web Title: Action taken against two-wheelers blowing firecracker horn, 24 persons booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.