गुजरातच्या रेती चोरी करणाऱ्या 11 ट्रकवर कासा पोलिसांची केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 09:42 PM2018-09-15T21:42:27+5:302018-09-15T21:42:50+5:30
कासा - डहाणू तालुक्यातील कासा पोलिसांनी गुजरातच्या 11 ट्रकवर कारवाई करुन रेती माफिया अटक केली आहेत. या 11 कंटेनरमधून 62 ब्रास रेती जप्त केली असून तब्बल 2 कोटी 26 लाख 20 हजाराचा रेती व ट्रक सहित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या मध्ये 6 लाख 20 हजार किंमतीची केवळ रेती आहे.
या मध्ये आरोपी संदीप महेंद्र राॅय (वडोली), रोशन राकवास यादव (वडोली), सतेेंद्रचरास रामरास यादव (पालेज), राजेंद्र दयाराम वर्मा ( वलसाना ), शितलाप्रसाद हरभजन धुरिया( अंकलेश्वर), राजेश रामकरण यादव(वलसाना)बगवंत बिरकुट गुप्ता(वलसाना), मोहमद नाफीज रईस खान(चिखली), फरीयाद मनाजू दवान(वडोदरा), जगदिश रामकरण शाहु(वियोदरा), जोहर सिरियाजुद्दीन अढी(अंकलेश्वर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांना गुजरातहून मुंबईकडे चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक करणारे कंटेनर निघाले असल्याची गुप्त बातमी हाती लागताच रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास चारोटी टोलनाका येथे पोलिश अधिक्षक गौरव सिंग व अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रकाश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली साफळा रचून रेतीचे कंटेनर पोलीसांनी अडवले असता .त्यांना गाडीत रेडिमेक्सची असल्याची बिल्टी दाखवली गेली .मात्र पोलिसांनी कंटेनरमध्ये साहित्य तपासले असता त्यामध्ये रेडिमेक्सच्या नावाखाली गाैणखनिज (रेती) पिशव्या मध्ये भरलेले असल्याचे आढळले.त्यानंतर कासा पोलीसांनी ट्रक जप्त करुन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना डहाणू कोर्टात हजर केले असता 21 तारखेपर्यन्त सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान यामुळे गुजरातहून मुंबईकडे चोरटी रेती वाहतूक उघड झाली आहे.सदर आरोपी हे गुजरात राज्यातील भरूच,बलसाड, बलसाना येथून रेती भरून मुंबईकडे विक्री साठी नेत होते. व कोणालाही संशय येवू नये यासाठी आरोपी रेती पिशवीत भरून कंटेनरमध्ये भरायचे पुढील तपास कासा पोलिस करत आहेत.