सोशल मीडियाच्या Blue Tick स्कॅमचा अभिनेत्रीला गंडा; पोलिसांनी नोंदवला FIR
By गौरी टेंबकर | Published: March 3, 2023 12:37 PM2023-03-03T12:37:22+5:302023-03-03T12:38:04+5:30
अभिनेत्रीने प्रथम १६ हजार २५० आणि नंतर १५ हजार रुपये हस्तांतरित केले, परंतु तिच्या कोणत्याही हँडलची पडताळणी झाली नाही.
मुंबई- संगीतकार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडिया पडताळणी घोटाळा (ब्लू टीक स्कॅम) मध्ये चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
करिष्मा कार असे अभिनेत्रीचे नाव असून तिने टीव्ही शो आणि पंजाबी व दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी, तिला गुरु नावाने इंस्टाग्राम फेसबुक आणि स्नॅपचॅट हँडलसाठी तिची सोशल मीडिया पडताळणी (ब्लू टिक) करण्याची ऑफर देणारा एक संदेश इन्स्टाग्रामवर आला. गुरुने दावा केला की तो कमी खर्चात हे काम करू शकतो. "आम्ही गुरुचे इंस्टाग्राम प्रोफाईल तपासले ज्यामध्ये तो संगीतकार असल्याचे सांगितले होते. त्याच्याकडे एक सत्यापित हँडल आहे," असे तिचे व्यवस्थापक जॉन डिसूझागुरु यांनी पोलिसाना सांगितले. त्यांना सोशल मीडिया पडताळणी करण्याचे निकष माहित आहेत असे सांगत त्यासाठी ३२ हजार रुपयांची मागणी केली.
गुरुने आम्हाला खर्च आणि त्यांच्या बँकिंग माहितीच्या तपशीलांसह एक ईमेल पाठवला. इंस्टाग्राम व्हेरीफाईड पंधरवड्याच्या आत केले जाईल आणि तसे न झाल्यास तो तिला पैसे परत करेल. तसच त्यानंतर विनामूल्य सत्यापन प्रक्रिया पूर्ण करेल, असेही भामट्यांनी सांगितले. त्यांनतर डिसेंबर २०२२ मध्ये, अभिनेत्रीने प्रथम १६ हजार २५० आणि नंतर १५ हजार रुपये हस्तांतरित केले, परंतु तिच्या कोणत्याही हँडलची पडताळणी झाली नाही. त्यानंतर गुरूने तिला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आणि तिच्या कॉल आणि मेसेजला उत्तर देणे बंद केले. यापूर्वी अशाच एका घोटाळ्यात अभिनेत्रीची अन्य एका व्यक्तीकडून ५१ हजार रुपयांची फसवणूक झाली होती.