कपड्यांशिवाय व्हिडीओ बनवण्यास नकार दिला; अभिनेत्रीने मोलकरणीस चप्पलने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 05:47 PM2021-12-13T17:47:08+5:302021-12-13T17:57:22+5:30

Actress assaulted minor maid : सर्व माहिती मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्रीविरुद्ध भादंविच्या अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Actress assaulted minor maid with chappal; Mumbai Police arrested | कपड्यांशिवाय व्हिडीओ बनवण्यास नकार दिला; अभिनेत्रीने मोलकरणीस चप्पलने केली मारहाण

कपड्यांशिवाय व्हिडीओ बनवण्यास नकार दिला; अभिनेत्रीने मोलकरणीस चप्पलने केली मारहाण

Next

मुंबईपोलिसांनी एका २५ वर्षीय अभिनेत्रीला तिच्या अल्पवयीन मोलकरणीवर मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वर्सोवा पोलिसांनी मोलकरणीच्या कुटुंबाकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक केली आहे.

या अभिनेत्रीची ओळख उघड करण्यात आलेली नसली तरी, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या या अभिनेत्रीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या आहेत. ही अभिनेत्री सध्या वर्सोवा परिसरात एकटीच राहते.

ना मास्क, ना डिस्टन्सिंग; सचिनची मुलगी सारा तेंडुलकरसह बॉलिवूड अभिनेत्रींची कॉन्सर्टला हजेरी

मोलकरणीचा आरोप आहे की, अभिनेत्रीने दारूच्या नशेत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले, परंतु यावेळी तिने कपड्यांशिवाय व्हिडिओ बनवण्यास दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्याने अभिनेत्रीने सॅन्डलने मारहाण केली. मोलकरीण घरी पोहोचल्यावर तिच्या बहिणीने जखमेच्या खुणा पाहून चौकशी केली. सर्व माहिती मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली. वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्रीविरुद्ध भादंविच्या अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

Web Title: Actress assaulted minor maid with chappal; Mumbai Police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.