२०० काेटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:46 AM2021-09-07T09:46:20+5:302021-09-07T09:47:10+5:30
दिल्ली पोलिसांची कारवाई; अधिकारी असल्याचा रचायची बनाव, २१ प्रकरणांत गुन्हेगार
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री लीना मारिया पाॅल हिला २०० काेटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दिल्ली पाेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुकेश चंद्रशेखर याची ती प्रेयसी आहे. याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचीही गेल्या आठवड्यात साक्षीदार म्हणून चाैकशी करण्यात आली हाेती.
लीना पाॅल हिने मल्याळम, तेलुगू, तसेच तामिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मद्रास कॅफे’ हा तिचा चित्रपट हिट झाला हाेता. एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आराेपांखाली सुकेश चंद्रशेखर याला अटक करण्यात आली हाेती. त्याने तुरुंगात असतानाच अनेकांकडून खंडणी उकळली आहे.
फाेर्टीस हेल्थकेअर कंपनीचे प्रमाेटर मलविंदरसिंग आणि शिविंदरसिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पत्नींची फसवणूक केली हाेती. या प्रकरणात लीना पाॅल हिने मदत केल्याचा आराेप आहे. चंद्रशेखरच्या काेठडीतून पाेलिसांनी दाेन माेबाइल फाेन जप्त केले हाेते. तुरुंगातूनच ताे अनेक उद्याेगपतींच्या संपर्कात हाेता. ताे आणि लीना हे बडे अधिकारी असल्याचा बनाव रचून फसवणूक करायचे. लीनकडे अफाट संपत्ती असल्याचे आतापऱ्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
गँगस्टर रवी पुजारीच्या हिटलिस्टवर आहे लीना पाॅल
nलीना पाॅल हिने माॅडेलिंगपासून कारकीर्द सुरू केली हाेती. काही चित्रपटांमध्ये तिने काम केल्यानंतर ती घाेटाळेबाजांच्या संपर्कात आली हाेती. अनेकांची फसवणूक करताना ती गँगस्टर रवी पुजारीच्या हिटलिस्टवरही आली हाेती.
nकाेची येथे तिच्या ब्युटी पार्लरमध्ये तिच्यावर गाेळीबारही झाला हाेता.
अनेक बड्या अभिनेत्रींकडेही नसतील एवढ्या आलिशान मालमत्ता तिच्या नावावर आहेत.
लीना लावायची पैशाची विल्हेवाट
लीना पाॅलवर आतापर्यंत २१ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. चंद्रशेखर आणि लीना पाॅल यांनी २०१३ मध्ये एका बँकेचीही फसवणूक केली हाेती. तिला अनेकदा अटकही करण्यात आली आहे. खंडणीच्या नावाखाली उकळण्यात आलेला पैसा कुठे आहे, याची माहिती तिच्याकडे असल्याचा पाेलिसांचा दावा आहे.