अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:54 PM2024-03-08T21:54:10+5:302024-03-08T21:55:09+5:30
Actress Kranti Redkar : यासंदर्भात क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : एनसीबी मुंबई झोनचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरला (Kranti Redkar) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रांती रेडकर हिला जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील मेसेज पाकिस्तानी नंबरवरून आल्या आहे. याबाबत क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय, तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच, या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
Maharashtra | Actress Kranti Redkar wife of former Mumbai NCB Zonal Director Sameer Wankhede received death threats, and obscene messages coming from Pakistani numbers, Sameer Wankhede's wife has lodged her complaint at Goregaon Police Station: Mumbai Police
— ANI (@ANI) March 8, 2024
क्रांती रेडकरने ट्विटद्वारे म्हटले आहे की, माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि ब्रिटनमधून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. हे गेल्या एक वर्षापासून होत आहे. पोलिसांना वेळोवेळी कळविण्यात आले. तसेच, क्रांती रेडकरने आपल्या या पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई पोलिसांना देखील टॅग केले आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@mumbaipolice I have been receiving death threats on my mobile number from various Pakistani numbers and a number from the Uk. Just wanted to bring it to your kind notice 🙏 This has been happening since last one year. The police… pic.twitter.com/pdgytGCYRp
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) March 8, 2024
आर्यन खान प्रकरणापासून समीर वानखेडे चर्चेत
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. तसेच, याप्रकरणी मोठी लाच घेतल्याचा आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आले. या प्रकरणात समीर वानखेडे यांची ईडी चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार पोलीस स्थानकात केल्याचे सांगितले आहे.