अभिनेत्री मैथिलीचा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:28 PM2022-05-31T17:28:17+5:302022-05-31T17:34:09+5:30

Suicide Attempt : अभिनेत्रीने 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अभिनेत्रीला वाचवले ही दिलासादायक बाब आहे.

Actress Maithili attempts suicide by taking sleeping pills, police save life | अभिनेत्री मैथिलीचा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण

अभिनेत्री मैथिलीचा झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण

googlenewsNext

मनोरंजन विश्वातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलगू टीव्ही अभिनेत्री मैथिलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्रीने 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अभिनेत्रीला वाचवले ही दिलासादायक बाब आहे.

अशा अवस्थेत ही अभिनेत्री पोलिसांना सापडली

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तिच्या फोनचे सिग्नल ट्रॅक करत योग्य वेळी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले. अभिनेत्री तिच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता मैथिलीला उपचारासाठी निम्स रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

31 मे रोजी पंजागुट्टा पोलीस स्टेशनला मैथिलीच्या आत्महत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मैथिलीच्या घरी पोहोचून होणारी वाईट घटनेला आळा घातला आहे.  

अभिनेत्रीने पतीवर हे आरोप केले आहेत

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 6 महिन्यांपूर्वी मैथिलीने तिच्या पतीविरोधात छळाचा गुन्हा दाखल केला होता. अभिनेत्रीने २७ सप्टेंबर २०२१ रोजी पीएस पंजागुट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये मैथिलीने तिचा पती श्रीधर रेड्डी आणि इतर ४ जणांवर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून आता हे प्रकरण कायदेशीर कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे.

मैथिलीने पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मैथिलीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी दाखल गुन्ह्यासह आरोपपत्रही दाखल करण्यात आले.

 

Web Title: Actress Maithili attempts suicide by taking sleeping pills, police save life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.