शर्लिन चोप्राने पोलिसांत नोंदवला जबाब; साजिदवर सलमानचा वरदहस्त असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 07:32 AM2022-10-30T07:32:22+5:302022-10-30T07:32:38+5:30

साजिद सध्या सलमान खान होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी आहे.

Actress Sherlyn Chopra has filed a police statement | शर्लिन चोप्राने पोलिसांत नोंदवला जबाब; साजिदवर सलमानचा वरदहस्त असल्याचा आरोप

शर्लिन चोप्राने पोलिसांत नोंदवला जबाब; साजिदवर सलमानचा वरदहस्त असल्याचा आरोप

googlenewsNext

मुंबई : अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने चित्रपट निर्माते साजिद खानविरुद्ध केलेल्या छेडछाडीच्या आरोपानंतर शनिवारी तिने जुहू पोलीस ठाण्यात तिचा जबाब नोंदविला. साजिद खानवर सलमान खानचा वरदहस्त आहे. त्यामुळे त्याच्या केसालादेखील कोणीच धक्का लावू शकत नाही, असा आरोप चोप्राने यावेळी केला.

एका महिला पोलीस अधिकाऱ्याला या प्रकरणात आपले म्हणणे नोंदविण्याची विनंती केली. मात्र, फारशी मदत मिळाली नाही, असे शर्लिन म्हणाली. या प्रकरणात निःपक्षपाती चौकशीची मागणी तिने केली. याआधी शर्लिन अन्य एका चित्रपट निर्मात्याविरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती. साजिद सध्या सलमान खान होस्ट करत असलेल्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी आहे.

Web Title: Actress Sherlyn Chopra has filed a police statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.