अभिनेत्री श्रावणी कोंडापल्लीची आत्महत्या, तिघांना कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 05:49 AM2020-09-18T05:49:56+5:302020-09-18T05:51:58+5:30
कोंडापल्ली हिने ८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. वरील तिघांवर कोंडापल्ली हिला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या तिघांनी केलेल्या छळामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप आहे.
हैदराबाद : दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री श्रावणी कोंडापल्ली (२६) हिच्या मृत्यूप्रकरणी दूरचित्रवाणी वाहिनीवरील अभिनेता, स्थावर मालमत्तांचे व्यवहार करणारा आणि टॉलीवूडमधील निर्मात्याला न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे.
कोंडापल्ली हिने ८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. वरील तिघांवर कोंडापल्ली हिला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या तिघांनी केलेल्या छळामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील अभिनेता अंबाती देवराजा रेड्डी (२४) आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार करणारा मंगमुथुला साई कृष्णा रेड्डी (२८) यांना या आठवड्यात एस.आर. नगर पोलिसांनी अटक केली, तर टॉलीवूड निर्माता गुम्माकोंडा अशोक रेड्डी हा बुधवारी पोलिसांना शरण आला. संयुक्त पोलीस आयुक्त ए.आर. श्रीनिवास यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या तिन्ही आरोपींचे वेगवेगळ्या वेळी श्रावणीशी संबंध होते. प्रत्येकाने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते व तिच्या इतरांशी असलेल्या संबंधांवरून ते तिचा छळ करायचे.
अभिनयासाठी हैदराबादेत
श्रावणी कोंडापल्ली ही मूळची काकिनाडाची (आंध्र प्रदेश). ती आठ वर्षांपूर्वी दूरचित्रवाणी मालिकांत काम करण्यासाठी हैदराबादेत आली होती. तिला ‘मानासू ममथा’ आणि ‘मौनरागम’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका मिळाल्या.
8 सप्टेंबरच्या सायंकाळी श्रावणी आंघोळीला गेली. ती तासाभरानंतरही परतली नाही. तिच्या कुटुंबियांना संशय आल्यावर त्यांनी दार तोडले, तेव्हा ती बेशुद्ध झालेली होती. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अभिनेत्री श्रावणी कोंडापल्लीची
आत्महत्या, तिघांना कोठडी