अभिनेत्री श्वेता तिवारी, पती अभिनव कोहली यांची पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 21:05 IST2020-11-10T21:05:02+5:302020-11-10T21:05:29+5:30
Actress Shweta Tiwari : श्वेता आणि अभिनवला 4 वर्षांचा मुलगा असून त्याचा सांभाळ करण्यावरून पती-पत्नीमध्ये वादंग सुरू आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी, पती अभिनव कोहली यांची पोलीस ठाण्यात धाव
अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहली विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याचप्रमाणे श्वेताने पोलीस ठाण्यातून काढता पाय घेताच काही वेळातच तिचा पती अभिनेता अभिनव कोहली देखील समता नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. श्वेता आणि अभिनवला 4 वर्षांचा मुलगा असून त्याचा सांभाळ करण्यावरून पती-पत्नीमध्ये वादंग सुरू आहे.
श्वेता आणि अभिनव यांचे लग्नाचे नाते तुटल्याने ते दोघेही सध्या विभक्त राहतात. श्वेता आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचा आरोप करत अभिनवने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने मुलाची कस्टडी आपल्याकडे देण्यात यावी अशी मागणी केली आहे. श्वेता आणि अभिनवचा मुलगा सध्या श्वेताकडे असून ती अभिनवला त्याला भेटू देत नसल्याने अभिनव चिडला आहे.