व्यसनी बापाला मुलानेच संपविले; मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:15 PM2020-06-01T14:15:46+5:302020-06-01T14:16:03+5:30

श्रावण पवार याचा मृतदेह घराच्या छताला गळफास लावलेल्या स्थितीत रविवारी दुपारी ४ वाजता आढळून आला.

The addicted father was killed by the son; Charge of murder against the child mac | व्यसनी बापाला मुलानेच संपविले; मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल

व्यसनी बापाला मुलानेच संपविले; मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल

Next

यवतमाळ: दारूच्या नशेत कुटुंबातील सदस्यांना त्रास देणाऱ्या बापाला मुलानेच संपविल्याचा प्रकार नेर येथे उघड झाला. रविवारी येथील विकासनगरातील श्रावण गोब्या पवार (४२) या खासगी वायरमनचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पुढे आले होते. पोलिसांच्या तपासात श्रावणला मुलानेच ठार मारल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणी मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

श्रावण पवार याचा मृतदेह घराच्या छताला गळफास लावलेल्या स्थितीत रविवारी दुपारी ४ वाजता आढळून आला. मात्र त्याचे दोनही हात दोरीने मागे बांधून होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी संशय बळावला. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवित सत्य घटना पुढे आणली. श्रावण हा दारूच्या आहारी गेला होता. कुटुंबाचे पालनपोषण करत नव्हता. पत्नी व मुलांना सतत मारहाण करत असल्याने ही मंडळी त्रस्त होती. दरम्यान, पत्नी एका मुलाला घेवून माहेरी निघून गेली. 

रविवारी दुपारी १७ वर्षीय मुलगा आणि श्रावण यांच्यात वाद झाला. त्यातच मुलाला मारहाणही करण्यात आली. यामुळे चिडून या विधिसंघर्षग्रस्त बालकाने वडील श्रावण यांना उशीने तोंड दाबून ठार मारले. आत्महत्येचा देखावा करण्यासाठी त्याने श्रावणला दोरी बांधून छताला लटकविले. मात्र त्यावेळी तो बांधलेले हात सोडण्याचे विसरला. हा सारा घटनाक्रम त्याने पोलिसांपुढे मांडला. या प्रकरणी श्रावणचा भाऊ श्रीराम गोब्या पवार (रा.लासीना, ता.नेर) यांनी नेर पोलिसात तक्रार दिली. यावरून मुलाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार प्रशांत मसराम करीत आहे.

Web Title: The addicted father was killed by the son; Charge of murder against the child mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.