लाच घेताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 11:36 PM2022-03-30T23:36:23+5:302022-03-30T23:36:57+5:30
या कामाची कागदपत्र ऐरोली कार्यालयात सादर केली होती. फाईलची शिफारस वाशी कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविणे आवश्यक होते.
नवी मुंबई: एमएसईडीसीएल कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख ला 50 हजार रूपयांची लाच घेताना अटक केली आहे. ठेकेदाराची अतिरिक्त कामाची शिफारस वरिष्ठांकडे करण्यासाठी लाच मागितली होती.
ऐरोली उपविभाग कार्यालयात वर्षा देशमुख काम करत होती. फिर्यादी व्यक्त ठेकेदार असून त्याने इलेक्ट्रिकल कनेक्शन मध्ये लोड वाढविण्याचे काम घेतले होते. या कामाची कागदपत्र ऐरोली कार्यालयात सादर केली होती. फाईलची शिफारस वाशी कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविणे आवश्यक होते. या शिफारशीसाठी ५० हजार रुपये मागितले होते. याविषयी 25 मार्च ला तक्रार केली होती. 30 तारखेला 50 हजार रूपये लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे.