कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; गोवा बनावटीच्या दारुसह १० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 01:32 PM2021-06-15T13:32:53+5:302021-06-15T13:33:51+5:30

Admirable performance of Kankavli police : गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची टीप कणकवली पोलिसांना मिळाली होती.

Admirable performance of Kankavli police; 10 lakh 64 thousand items including Goa made liquor confiscated | कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; गोवा बनावटीच्या दारुसह १० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

कणकवली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; गोवा बनावटीच्या दारुसह १० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने होणारी गोवा बनावटीच्या २ लाख ६४ हजार रुपयांच्या दारुसह ८ लाखाचा ट्रक असा एकूण १० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल कणकवलीपोलिसांनी जप्त केला आहे. महामार्गावर ओसरगाव टोलनाक्याजवळ १४ जून रोजी रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी २ युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची टीप कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ओसरगाव महामार्ग टोलनाका येथे कणकवली पोलिसांचे पथक टेहळणी करत होते. संशयित ट्रक क्र. एय एच -०४ - इवाय - ४५६७ टोलनाक्यावर आला असताना पाहणी केली असता हौद्यात २०० बॉक्समध्ये गोवा बनावटीची २ लाख ६४ हजार किंमतीची दारू आढळून आली. या अवैध दारू वाहतुकप्रकरणी संतोष विठ्ठल शिंगाडे (  ३५, रा. रानबांबुळी, ता कुडाळ ) आणि अनस इब्राहिम चेअरडीएल (३७ , सध्या रा. भटवाडी फेडरल बँक समोर सावंतवाडी, मूळ रा. वेलानागल्लूर जि. त्रिशूर, केरळ ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ (अ ), ( ई ), ८१, ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गुरव यांनी केली. पुढील तपास एपीआय सागर खंडागळे करत आहेत.

Web Title: Admirable performance of Kankavli police; 10 lakh 64 thousand items including Goa made liquor confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.